मुंबई : म्युच्युअल फंडात एसआयपी नोंदणी करण्यासाठी आता फक्त तीन दिवसांचा वेळ लागणार आहे. राष्टÑीय शेअर बाजाराने (एनएसई) त्यासाठी ई-मॅन्डेट सुविधा सादर केली आहे.
म्युच्युअल फंडात पैसे गुंतविताना ‘सीस्टिमेटी इन्व्हेस्टमेंट प्लॅन’ (एसआयपी) उपलब्ध असते. दरमहा त्यात पैसे टाकले जातात. ही गुंतवणूक करताना आधी दोन ते तीन आठवड्यांचा कालावधी लागत होता. संबंधित गुंतवणूकदारांच्या कागदपत्रांच्या विस्तृत तपासणीनंतर प्रत्यक्ष स्वाक्षरीद्वारेच ही नोंद होऊ शकत होती. त्यात खूप वेळ वाया जात होता.
डिजिटायझेशनंतर आतान ई-मॅन्डेट सेवा सादर करण्यात आली आहे. ई-मन्डेट हा एनएसईच्या डिजिटायझेशन उपक्रमाचा महत्त्वाचा भाग आहे. या आधारे आता गुंतवणूकदार यूआयडीएआयच्या माध्यमातून ई-स्वाक्षरीद्वारे म्युच्युअल फंडात एसआयपीसाठी गुंतवणूक करू शकतात.
एसआयपी नोंदणी आता तीन दिवसांत
म्युच्युअल फंडात एसआयपी नोंदणी करण्यासाठी आता फक्त तीन दिवसांचा वेळ लागणार आहे. राष्टÑीय शेअर बाजाराने (एनएसई) त्यासाठी ई-मॅन्डेट सुविधा सादर केली आहे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 01:52 AM2017-12-25T01:52:25+5:302017-12-25T01:52:25+5:30