Ratan Tata News : रतन टाटा या नावाला कुठल्याही ओळखीची गरज नाही. भारताचे ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांचे बुधवारी रात्री निधन झालं. वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी मुंबईतील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. रतन टाटा यांच्या व्यक्तिमत्त्वावर नजर टाकली तर ते केवळ उद्योजकच नाही, तर ते उदार व्यक्ती, लोकांसाठी आदर्श आणि प्रेरणास्थान होते.
LIVE
10 Oct, 24 : 06:11 PM
रतन टाटा यांच्या पार्थिवावर मुंबईतील वरळी येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
#WATCH | Last rites of veteran industrialist Ratan Tata, being performed with state honour at Worli crematorium in Mumbai pic.twitter.com/08G7gnahyS
— ANI (@ANI) October 10, 2024
10 Oct, 24 : 06:11 PM
रतन टाटाांचा विश्वासू सहकारी शंतनू नायडूने वाहिली अखेरची श्रद्धांजली
#WATCH | Shantanu Naidu, veteran industrialist Ratan Tata's trusted aide leaves from Worli Crematorium in Mumbai after paying his last tribute to Ratan Tata.#RatanTatapic.twitter.com/8cTvWdGn16
— ANI (@ANI) October 10, 2024
10 Oct, 24 : 03:18 PM
गृहमंत्री अमित शाहंकडून रतन टाटांना श्रद्धांजली
गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गुजरातचे मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल, केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांनी रतन टाटांना श्रद्धांजली वाहिली.
#WATCH | Union Home Minister Amit Shah pays last tributes to Ratan Tata in Mumbai. pic.twitter.com/RfgOuVhmPC
— ANI (@ANI) October 10, 2024
10 Oct, 24 : 02:45 PM
आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरेंनी घेतलं टाटांच्या पार्थिवाचं दर्शन
आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरेंनी यांनी एनपीसीएमध्ये घेतलं टाटांच्या पार्थिवाचं दर्शन
#WATCH | Shiv Sena (UBT) leader Uddhav Thackeray along with Aadtiya Thackeray, Anil Desai and Arvind Sawant pays last tributes to Ratan Tata in Mumbai pic.twitter.com/tyznXnvfd0
— ANI (@ANI) October 10, 2024
10 Oct, 24 : 02:34 PM
भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी श्रद्धांजली वाहिली
भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही मुंबईत रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहिली.
#WATCH | Former head coach of the Indian cricket team, Ravi Shashtri pays last tributes to Ratan Tata in Mumbai pic.twitter.com/ewXldcdOqK
— ANI (@ANI) October 10, 2024
10 Oct, 24 : 01:19 PM
उद्धव ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरे यांनी श्रद्धांजली वाहिली
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह आमदार आदित्य ठाकरे, अनिल देसाई आणि अरविंद सावंत यांनी उद्योगपती रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहिली.
#WATCH | Shiv Sena (UBT) leader Uddhav Thackeray along with Aadtiya Thackeray, Anil Desai and Arvind Sawant pays last tributes to Ratan Tata in Mumbai pic.twitter.com/tyznXnvfd0
— ANI (@ANI) October 10, 2024
10 Oct, 24 : 12:39 PM
रतन टाटा यांना भारतरत्न मिळावा यासाठी प्रस्ताव
टाटा सन्सचे मानद अध्यक्ष रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांचे नाव देशाच्या सर्वोच्च सन्मान भारतरत्नसाठी प्रस्तावित करण्यात आले आहे. शिंदे-फडणवीस सरकारने गुरुवारी हा निर्णय घेतला आहे. आज महाराष्ट्र मंत्रिमंडळाची बैठक झाली, यात ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांचे नाव भारतरत्न पुरस्कारासाठी प्रस्तावित करण्यात यावे, अशी चर्चा झाली आणि नंतर प्रस्तावित करण्यात आले. मंत्रिमंडळाच्या बैठकीत रतन टाटा यांच्या स्मरणार्थ शोक ठरावही मंजूर करण्यात आला.
10 Oct, 24 : 12:05 PM
केंद्रीय मंत्री पियुष गोयल झाले भावूक
केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी उद्योगपती रतन टाटा यांना श्रद्धांजली पाहिली. यावेळी बोलताना ते भावूक झाले. ते म्हणाले की, एकदा ते मुंबईत आमच्या घरी नाश्ता करण्यासाठी आले होते. नाश्त्यासाठी आम्ही त्यांना इडली, सांबार आणि डोसा दिला. त्यांनी ते आनंदाने खाल्ले. या साध्या नाश्त्याचे त्यांनी मनापासून कौतुक केले. त्यांच्यावर देशातील १४० कोटी जनतेचे प्रेम होते, असंही पियुष गोयल म्हणाले.
#WATCH | Union Minister Piyush Goyal breaks down as he gets emotional when recalls his memory with Ratan Tata, he says, "...The small and thoughtful gestures which make the man the Ratan Tata - 140 crore Indian love and the world loves."
— ANI (@ANI) October 10, 2024
Union Minister Piyush Goyal says, " I… pic.twitter.com/zPAIS9S0ai
10 Oct, 24 : 11:42 AM
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी रतन टाटा यांना आदरांजली वाहिली
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी मुंबईतील एनसीपीए लॉनमध्ये रतन टाटा यांना आदरांजली वाहिली.
#WATCH | Maharashtra deputy CM Ajit Pawar and NCP working president Praful Patel pay last respect to Ratan Tata, at NCPA lawns, in Mumbai pic.twitter.com/j1E6DyDOrf
— ANI (@ANI) October 10, 2024
10 Oct, 24 : 11:40 AM
RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी श्रध्दांजली वाहिली
RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी मुंबईत उद्योगपती रतन टाटा यांना श्रध्दांजली वाहिली.
#WATCH | Mumbai | RBI Governor Shaktikanta Das pays last respects to industrialist Ratan Tata in Mumbai pic.twitter.com/TJVJyzcOb3
— ANI (@ANI) October 10, 2024
10 Oct, 24 : 10:26 AM
रतन टाटा यांचे पार्थिव NCPAत आणले, सर्वसामान्यांना अंत्यदर्शन घेता येणार
#WATCH | Mumbai | Mortal remains of veteran industrialist Ratan N Tata brought to NCPA lawns, where people have gathered to pay their last respects to him ahead of state funeral pic.twitter.com/4X85EyGmZJ
— ANI (@ANI) October 10, 2024
10 Oct, 24 : 10:23 AM
रतन टाटा यांच्यावर वरळी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार, ४ वाजता निघणार अंत्ययात्रा
#WATCH | Mumbai | Mortal remains of Ratan Tata, draped in the national flag, kept at NCPA lawns for the public to pay last respects
— ANI (@ANI) October 10, 2024
The last rites will be held at Worli crematorium after 4pm today pic.twitter.com/hRdnIrytEl
10 Oct, 24 : 10:19 AM
केरळचे मुख्यमंत्री पिनरई विजयन यांची रतन टाटा यांना आदरांजली
Kerala CM Pinarayi Vijayan tweets, "Deeply saddened by the passing of Shri Ratan Tata, an industrialist with a lasting legacy in Indian history. His unwavering support for Kerala’s development will always be remembered. Heartfelt condolences to his family and the Tata Group." pic.twitter.com/uND92BEsy0
— ANI (@ANI) October 10, 2024
10 Oct, 24 : 09:25 AM
गुडबाय, माय डियर लाईटहाऊस.. टाटांसाठी शंतनू नायडूची भावूक पोस्ट
रतन टाटा हे केवळ त्यांच्या कुशल व्यावसायिक नेतृत्वासाठीच नव्हे तर त्यांच्या महत्त्वपूर्ण परोपकारी योगदानासाठीही प्रसिद्ध होते. त्यांच्या नंतरच्या काळात, त्यांचे विश्वासू सहाय्यक शंतनू नायडू यांच्याशी त्यांच्या जवळच्या संबंधांनी लोकांचे लक्ष वेधून घेतलं आहे. रतन टाटा यांच्या निधनानंतर शंतनू यांनी सकाळी एक पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांच्या मैत्रीने माझ्या आत एक पोकळी सोडली आहे, ती भरून काढण्याच्या प्रयत्नात मी आयुष्य घालवणार आहे. दु:ख ही प्रेमाची किंमत आहे. गुडबाय, माय डियर लाईटहाऊस," असे ३० वर्षीय शंतनू नायडू यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
"माझ्यातली पोकळी भरुन काढण्याच्या प्रयत्नात..."; टाटांसह सावली सारख्या असणाऱ्या शंतनूची भावूक पोस्ट
— Lokmat (@lokmat) October 10, 2024
शंतनू नायडू यांनी गुरुवारी सकाळी एक भावूक पोस्ट करत रतन टाटांना श्रद्धांजली वाहिली#Ratantata#ShantanuNaidu#TataGroup
https://t.co/bbROFdwfQ3
10 Oct, 24 : 09:25 AM
अंतिम दर्शनासाठी सचिन तेंडुलकर टाटांच्या निवासस्थानी.
रतन टाटा यांच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन घेण्यासाठी सचिन तेंडुलकर हा त्यांच्या निवासस्थानी पोहोचला आहे.
#WATCH | Mumbai | Former Indian Cricketer Sachin Tendulkar arrives at Colaba residence of industrialist Ratan Tata to pay his last respects pic.twitter.com/xwpaDqHfO4
— ANI (@ANI) October 10, 2024
10 Oct, 24 : 09:05 AM
आज मी एक ज्येष्ठ मित्र गमावला याचं दुःख आहेच, पण.., राज ठाकरेंनी व्यक्त केल्या भावना
आज मी एक ज्येष्ठ मित्र गमावला याचं दुःख आहेच, पण एकूणच भारताने कदाचित शेवटचा असा 'कर्तृत्ववान तरीही निर्लेप राहिलेला उद्योजक' गमावला, हे त्याहून मोठं दुःख.
रतन टाटा यांचं निधन झालं. जवळपास १५६ वर्षांची परंपरा असलेल्या एका उद्योग समूहाला ज्यांनी खऱ्या अर्थाने एकविसाव्या शतकांत आणलं आणि 'टाटा' ही नाममुद्रा ज्यांनी जगभर नेली ती रतन टाटांनी.
— Raj Thackeray (@RajThackeray) October 10, 2024
बरं, हे सगळं करताना एखाद्या योगी माणसाची स्थितप्रज्ञताच ठेवायची ही टाटा समूहाची शिकवण पूर्णपणे… pic.twitter.com/q0kpqMlabW
10 Oct, 24 : 08:43 AM
एनसीपीएकडे जाणारा मरीन ड्राइव्हचा रस्ता पोलिसांनी केला बंद
#WATCH | Mumbai | Marine Drive road is closed beyond the Oberoi hotel as the Police have cordoned off the road leading to NCPA
— ANI (@ANI) October 10, 2024
The mortal remains of Ratan Tata will be kept at NCPA grounds for the public to pay their last respects before state funeral pic.twitter.com/OYU8vJwux8
10 Oct, 24 : 08:40 AM
रतन टाटा यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी NCPA मध्ये आणणार; तयारीला सुरुवात
#WATCH | Mumbai | Preparations are underway at NCPA, Nariman Point as mortal remains of Ratan Tata are to be brought here for the public to pay their last respects before the last rites pic.twitter.com/0sF29HFe2s
— ANI (@ANI) October 10, 2024
10 Oct, 24 : 08:11 AM
राज्यात एक दिवसाचा दुखवटा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती
ज्येष्ठ उद्योगपती, पद्मविभूषण #रतन_टाटा यांच्या निधनानंतर त्यांच्या सन्मानार्थ राज्यात आज ( गुरुवार १० रोजी) एक दिवसाचा दुखवटा पाळण्यात येणार आहे, यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली आहे.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) October 10, 2024
रतन टाटा यांना सन्मानपूर्वक निरोप देण्यासाठी श्रद्धांजली म्हणून हा शासकीय… pic.twitter.com/8aXCcxxcuO
10 Oct, 24 : 07:51 AM
रतन टाटा यांचा साधेपणा आणि नम्रता कधीही विसरणार नाही: आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा
Assam CM Dr Himanta Biswa Sarma tweets, "Shri Ratan Tata Ji’s legacy is one of compassion, statesmanship and unshakeable conviction in the India growth story. His life is defined by building enterprise and giving back to society. In his demise, people of Assam have lost one of… pic.twitter.com/Bw55fH00Zx
— ANI (@ANI) October 10, 2024
10 Oct, 24 : 07:45 AM
महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी वाहिली रतन टाटा यांना श्रद्धांजली
Maharashtra Governor CP Radhakrishnan expresses grief on the demise of the Chairman Emeritus of the Tata Group, Ratan Tata
— ANI (@ANI) October 10, 2024
In a condolence message, the Governor said: "Shri Ratan Tata was one of the the brightest jewels of the global Tata empire founded by the late Jamshedji…
10 Oct, 24 : 07:44 AM
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांंनी वाहिली रतन टाटा यांना आदरांजली
Deeply saddened by the passing of Sh. Ratan Tata, a visionary business leader, an extraordinary nation-builder, and a remarkable human being.
— Ashwini Vaishnaw (@AshwiniVaishnaw) October 10, 2024
His contributions to industry, society, and humanity have left an indelible legacy.
Heartfelt condolences to his family and loved ones… pic.twitter.com/upU2v8ivwP
10 Oct, 24 : 07:22 AM
चीन युद्धामुळे रतन टाटांची प्रेम कहाणी राहिली अधुरी; पण, नशिबाने काही वेगळेच ठरवले होते
10 Oct, 24 : 07:22 AM
‘असे’ घडले रतन टाटा; आजीने सांभाळले, स्कूटरमधून नॅनोची प्रेरणा अन् फोर्डला धडा शिकवला
10 Oct, 24 : 07:01 AM
रतन टाटा यांचे पार्थिव दर्शनासाठी NCPA येथे ठेवण्यात येणार
रतन टाटा यांचे पार्थिव दर्शनासाठी सकाळी १० ते दुपारी ३.३० या वेळेत NCPA येथे ठेवण्यात येणार आहे. या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबईच्या दक्षिण विभागाचे अतिरिक्त आयुक्त अभिनव देशमुख यांनी दिली.
#WATCH | Maharashtra: Additional Commissioner of South Region, Mumbai Police Abhinav Deshmukh says, "The mortal remains of Ratan Tata will be kept at NCPA for the darshan between 10 am to 3.30 pm...All police arrangements will be made..." pic.twitter.com/BBDQzHFP9Z
— ANI (@ANI) October 10, 2024
10 Oct, 24 : 06:47 AM
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी वाहिली रतन टाटा यांना श्रद्धांजली
भारत के प्रसिद्ध उद्योगपति श्री रतन टाटा जी के निधन का अत्यंत दुखद समाचार प्राप्त हुआ। उन्होंने देश की औद्योगिक प्रगति और सामाजिक विकास के लिए अपना संपूर्ण जीवन समर्पित किया। उनका दृष्टिकोण, समर्पण और व्यावसायिक कुशलता न केवल टाटा समूह को नई ऊँचाइयों तक ले गई, बल्कि राष्ट्र के… pic.twitter.com/kVXPWxy2bh
— Pushkar Singh Dhami (@pushkardhami) October 9, 2024
10 Oct, 24 : 06:45 AM
राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांची रतन टाटांना आदरांजली
भारत के प्रख्यात उद्योगपति एवं समाजसेवी श्री रतन टाटा जी का निधन अत्यंत दुःखद है।
— Bhajanlal Sharma (@BhajanlalBjp) October 9, 2024
श्री टाटा जी का योगदान केवल व्यावसायिक क्षेत्र तक ही सीमित नहीं था। उन्होंने समाज सेवा और राष्ट्र निर्माण में भी अपना अमूल्य योगदान दिया। उनके नेतृत्व में टाटा समूह ने न केवल वैश्विक स्तर पर भारत… pic.twitter.com/m0JbyUeflh
10 Oct, 24 : 06:44 AM
राष्ट्र उभारणीत भरीव योगदान दिले
रतन नवल टाटा यांच्या निधनाने आपण भारताचा एक अमूल्य सुपुत्र गमावला आहे. भारताची सर्वसमावेशक वाढ आणि विकासाची वचनबद्धता सर्वोत्कृष्ट असणारे परोपकारी श्री टाटा हे निःसंदिग्ध सचोटी आणि नैतिक नेतृत्वाचे आदर्श होते. ते लाखो लोकांसाठी एक प्रेरणा होते. त्यांनी राष्ट्र उभारणीत भरीव योगदान दिले. त्यांच्या प्रियजनांना आमच्या संवेदना, या शब्दांत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी रतन टाटा यांना एक्सवर पोस्ट करत श्रद्धांजली वाहिली.
10 Oct, 24 : 06:08 AM
तुमची आठवण येईल: चंद्राबाबू नायडू
रतन टाटा यांच्यासारख्या दूरदृष्टीने आणि सचोटीने या जगावर फार कमी माणसांनी असा चिरस्थायी ठसा उमटवला आहे. आज, आपण फक्त एक व्यावसायिक नाही तर एक खरा मानवतावादी गमावला आहे. ज्याचा वारसा औद्योगिक क्षेत्राच्या पलीकडे जाऊन अनेकांनी आपल्या हृदयात जपला आहे. मी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करतो. त्यांच्या उद्योग, परोपकार आणि राष्ट्र उभारणीतील उल्लेखनीय योगदानाचे स्मरण करतो. त्यांचे विचार पिढ्यांना कायमचे प्रेरणा देतील. तुमची आठवण येईल. मनापासून संवेदना व्यक्त करतो, अशी आदरांजली आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी रतन टाटा यांच्या निधनाबाबत वाहिली.
10 Oct, 24 : 06:03 AM
भारताने एक सच्चा सुपुत्र आणि चॅम्पियन गमावला
काही आदर्श हे जीवंत पाठ्यपुस्तके असतात, जी आपल्याला नेतृत्व, यश आणि वारसा शिकवतात. विलक्षण तरीही आपलेसे येण्याजोगे व्यक्तिमत्त्व आम्हाला प्रेरणा देतात आणि मार्गदर्शन करतात. भारताने एक सच्चा सुपुत्र आणि चॅम्पियन गमावला आहे, अशा शब्दांत संगीतकार ए. आर. रेहमान यांनी रतन टाटा यांना एक्सवर पोस्ट करत आदरांजली वाहिली.
10 Oct, 24 : 05:43 AM
रतन टाटांचे योगदान उद्योजकांसाठी सदैव प्रेरणादायी असेल
श्री रतन टाटा यांच्या निधनाने खूप दुःख झाले. भारतीय उद्योगातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व, ज्यांचे योगदान स्वावलंबी भारताच्या उभारणीसाठी आणि त्यापुढील उद्योजकांसाठी सदैव प्रेरणादायी असेल. एक वचनबद्धता आणि करुणा असलेला माणूस, त्यांचे परोपकारी योगदान आणि विनम्रतेने त्यांनी स्वीकारलेल्या नीतिमत्तेचे प्रतिबिंब भारतीय उद्योगातील चिरस्थायी वारसा सोडत असल्याने या दुःखाच्यावेळी त्यांचे कुटुंब, मित्र, प्रशंसक आणि त्यांच्या संपूर्ण टाटा समूहाकडे मनापासून संवेदना व्यक्त करतो ओम शांती, या शब्दांत उपराष्ट्रपतींनी आदरांजली वाहिली.
10 Oct, 24 : 05:26 AM
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाहिली रतन टाटा यांना आदरांजली
रतन टाटा हे केवळ एक यशस्वी उद्योगपतीच नव्हते तर त्यांनी देश आणि समाजासाठी ज्या पद्धतीने काम केले त्यामुळे ते एक मोठे व्यक्तिमत्व देखील होते. त्यांनी केवळ यशस्वी उद्योगच उभारले नाहीत तर एक ट्रस्ट स्थापन केला आहे, एक ब्रँड ज्याने आपल्या देशाला जागतिक प्रतिमा मिळवून दिली आहे. खूप मोठ्या मनाची व्यक्ती आज आपल्याला सोडून गेली, ही देशाची मोठी हानी आहे, या शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रतन टाटा यांना आदरांजली वाहिली.
10 Oct, 24 : 05:12 AM
राज्य सरकारचे सर्व कार्यक्रम रद्द
दिग्गज उद्योगपती रतन टाटा यांनी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. राज्य सरकारचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.
10 Oct, 24 : 05:11 AM
अभिनेत्री प्रियांका चोप्रा यांची रतन टाटा यांना आदरांजली
तुमच्या दयाळूपणाने तुम्ही लाखो लोकांच्या जीवनाला अर्थ दिलात. तुमचे नेतृत्व आणि उदारतेचा वारसा अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील. तुम्ही आमच्या देशासाठी जे काही केले त्याबद्दल तुमच्या अतुलनीय समर्पणाबद्दल आभार. तुम्ही एक प्रेरणास्रोत आहात. आम्हा सर्वांना आणि खूप आठवण येईल, सर #RatanTata, या शब्दांत अभिनेत्री प्रियांका चोप्रा यांनी एक्सवर पोस्ट करत रतन टाटा यांना आदरांजली वाहिली.
10 Oct, 24 : 05:07 AM
सुंदर पिचाई यांनी रतन टाटा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला
भारताला अधिक चांगले बनवण्याबाबत त्यांना मनापासून काळजी होती, असे सांगत गुगलच्या सुंदर पिचाई यांनी रतन टाटा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.
10 Oct, 24 : 04:41 AM
रतन टाटांचे पार्थिव निवासस्थानी नेण्यात आले
दिग्गज उद्योगपती रतन टाटा यांचे ०९ ऑक्टोबर रोजी निधन झाले. ब्रीच कँडी रुग्णालयातून रतन टाटा यांचे पार्थिव कुलाबा येथील त्यांच्या निवासस्थानी नेण्यात आले.
#WATCH | Maharashtra: The mortal remains of Industrialist Ratan Tata, who passed away at Breach Candy Hospital in Mumbai, taken to his residence in Colaba
— ANI (@ANI) October 9, 2024
(Visuals from Breach Candy Hospital) pic.twitter.com/UYkZN0pFbG
10 Oct, 24 : 04:37 AM
दीपक केसरकर यांची ब्रीच कँडी रुग्णालयाला भेट
पालक मंत्री दीपक केसरकर यांनी रात्री एकच्या सुमारास ब्रीच कँडी रुग्णालयाला भेट दिली. रतन टाटा यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले. ते काही काळापासून आजारी होते.
10 Oct, 24 : 04:37 AM
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ब्रीच कँडी रुग्णालयाला भेट
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रात्री एकच्या सुमारास ब्रीच कँडी रुग्णालयाला भेट दिली. रतन टाटा यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले. ते काही काळापासून आजारी होते.
10 Oct, 24 : 01:31 AM
सदैव मदतीचा हात देणे हा रतन टाटा यांचा स्वभाव सदैव स्मरणात राहील - शरद पवार
जगभरात आपल्या गौरवास्पद कामगिरीतून देशाचा लौकीक वाढवणारे टाटा समूहाचे अध्यक्ष उद्योगपती रतन टाटा यांनी जगाचा निरोप घेतला. देशावर ओढवणाऱ्या नैसर्गिक अथवा मानवी अशा प्रत्येक संकटावर मात करण्यासाठी सदैव मदतीचा हात देणे हा रतन टाटा यांचा स्वभाव सदैव स्मरणात राहील, असं म्हणत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी टाटा यांना आदरांजली वाहिली.
जगभरात आपल्या गौरवास्पद कामगिरीतून देशाचा लौकीक वाढवणारे टाटा समूहाचे अध्यक्ष उद्योगपती रतन टाटा यांनी जगाचा निरोप घेतला. देशावर ओढवणाऱ्या नैसर्गिक अथवा मानवी अशा प्रत्येक संकटावर मात करण्यासाठी सदैव मदतीचा हात देणे हा रतन टाटा यांचा स्वभाव सदैव स्मरणात राहील. सामाजिक जाणीवेतून…
— Sharad Pawar (@PawarSpeaks) October 9, 2024
10 Oct, 24 : 01:27 AM
मुकेश अंबानी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहेत. रतन टाटा यांचं वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झालं. ते काही काळापासून आजारी होते.
10 Oct, 24 : 01:24 AM
भारताने एक दिग्गज, दूरदर्शी व्यक्ती गमावली : गौतम अदानी
"भारताने एक दिग्गज, दूरदर्शी व्यक्ती गमावली आहे, ज्यांनी आधुनिक भारताचा मार्ग नव्याने परिभाषित केला. रतन टाटा हे केवळ एक व्यावसायिक नेतृत्व नव्हतं - त्यांनी प्रामाणिकपणा, करुणा आणि व्यापक हितासाठी अढळ बांधिलकीसह भारताच्या भावनेला मूर्त रूप दिले. त्यांच्यासारखे दिग्गज कधीच कधीत जात नाहीत. ओम शांती", असं म्हणत उद्योजक गौतम अदानी यांनी त्यांना आदरांजली वाहिली.
India has lost a giant, a visionary who redefined modern India's path. Ratan Tata wasn’t just a business leader - he embodied the spirit of India with integrity, compassion and an unwavering commitment to the greater good. Legends like him never fade away. Om Shanti 🙏 pic.twitter.com/mANuvwX8wV
— Gautam Adani (@gautam_adani) October 9, 2024
10 Oct, 24 : 01:18 AM
ही भारतीय उद्योगजगताची मोठी हानी - अजित पवार
प्रत्येक भारतीयाच्या मनात प्रेम, आदर, आपुलकीचं स्थान निर्माण करणाऱ्या रतन टाटा यांचं निधन ही भारतीय उद्योगजगताची मोठी हानी आहे. टाटा परिवार आणि रतन टाटा यांच्या चाहत्यांच्या दु:खात मी सहभागी असून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. रतन टाटा यांना सद्गती लाभो, अशी प्रार्थना करतो,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.
Deeply saddened by the news of passing away of legendary industrialist and philanthropist Shri. Ratan Tata.
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) October 9, 2024
Apart from his invaluable contribution as an industrialist, he leaves behind a legacy of benevolence and compassion, underlined by his immense love for his country.
My… pic.twitter.com/VLXM0fTDqC
10 Oct, 24 : 01:13 AM
"तुम्हाला विसरता येणार नाही," आनंद महिंद्रांची भावूक पोस्ट
"रतन टाटा आपल्यात नाहीत यावर विश्वासच बसत नाही. भारताची अर्थव्यवस्था तेजीत आहे आणि रतन टाचा यांचं जीवन आणि कार्याचं यात मोठं योगदान आहे. या स्थितीत त्यांचं मार्गदर्शन मोलाचं ठरलं असतं," अशी भावूक पोस्ट महिंद्रा अँड महिंद्राचे प्रमुख आनंद महिंद्रा यांनी केली.
I am unable to accept the absence of Ratan Tata.
— anand mahindra (@anandmahindra) October 9, 2024
India’s economy stands on the cusp of a historic leap forward.
And Ratan’s life and work have had much to do with our being in this position.
Hence, his mentorship and guidance at this point in time would have been invaluable.… pic.twitter.com/ujJC2ehTTs
10 Oct, 24 : 01:10 AM
"रतन टाटा यांच्या योगदानामुळे केवळ टाटा समूहच नव्हे तर आपल्या देशाची जडणघडण घडली"
"आम्ही रतन नवल टाटा यांना अत्यंत दु:खाने निरोप दिला. खऱ्या अर्थाने एक असाधारण नेतृत्व ज्यांच्या अतुलनीय योगदानामुळे केवळ टाटा समूहच नव्हे तर आपल्या देशाची जडणघडण ही घडून आली," अशी प्रतिक्रिया टाटा सन्सचे चेअरमन एन. चंद्रशेखरन यानी दिली.
10 Oct, 24 : 01:05 AM
"नैतिकता आणि उद्यमशीलता यांचा अपूर्व आणि आदर्श संगम रतन टाटा यांच्या ठायी"
नैतिकता आणि उद्यमशीलता यांचा अपूर्व आणि आदर्श संगम रतन टाटा यांच्या ठायी होता. सुमारे १५० वर्षांची श्रेष्ठत्व आणि सचोटीची परंपरा असलेल्या टाटा ग्रुपची जबाबदारी यशस्वीरित्या पेलणारे रतनजी टाटा हे एक जीवंत आख्यायिका होते. त्यांनी वेळोवेळी दाखविलेला निर्णायक खंबीरपणा आणि मानसिक कणखरपणी टाटा ग्रूपला वेगळ्या औद्योगिक उंचीवर घेऊन गेला. त्यांना मी आदरपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो. रतनजी टाटा यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रतन टाटा यांना आदरांजली वाहिली.
दुर्मिळ रत्न हरपले
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) October 9, 2024
नैतिकता आणि उद्यमशीलता यांचा अपूर्व आणि आदर्श संगम रतनजी टाटा यांच्या ठायी होता. सुमारे १५० वर्षांची श्रेष्ठत्व आणि सचोटीची परंपरा असलेल्या टाटा ग्रुपची जबाबदारी यशस्वीरित्या पेलणारे रतनजी टाटा हे एक जिवंत आख्यायिका होते. त्यांनी वेळोवेळी दाखविलेला निर्णायक… pic.twitter.com/6O1KmyJkyj
10 Oct, 24 : 01:03 AM
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
भारताचे ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांचं बुधवारी रात्री निधन झालं. वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी मुंबईतील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. दरम्यान, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहेत.#RatanTata#EknathShindepic.twitter.com/OHZNsTKcx0
— Lokmat (@lokmat) October 9, 2024
10 Oct, 24 : 01:00 AM
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून रतन टाटांना आदरांजली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रतन टाटा यांचा फोटो शेअर करत त्यांना आदरांजली वाहिली. "मी मुख्यमंत्री असताना त्यांची गुजरातमध्ये वारंवार भेट होत असे. आम्ही विविध मुद्द्यांवर विचार विनिमय करत होतो. मला त्यांचा दृष्टीकोन खूप समृद्ध वाटला. मी दिल्लीत आलो, तेव्हाही आमचे संवाद सुरूच होते. त्यांच्या निधनानं अत्यंत दु:ख झालं आहे," असं म्हणत पंतप्रधानांनी रतन टाटा यांना आदरांजली वाहिली.
"
My mind is filled with countless interactions with Shri Ratan Tata Ji. I would meet him frequently in Gujarat when I was the CM. We would exchange views on diverse issues. I found his perspectives very enriching. These interactions continued when I came to Delhi. Extremely pained… pic.twitter.com/feBhAFUIom
— Narendra Modi (@narendramodi) October 9, 2024