Join us

Ratan Tata News LIVE: ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा पंचत्वात विलीन, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2024 12:52 AM

Ratan Tata Death News : रतन टाटा या नावाला कुठल्याही ओळखीची गरज नाही. भारताचे ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांचे बुधवारी रात्री निधन झालं.

10 Oct, 24 06:11 PM

रतन टाटा यांच्या पार्थिवावर मुंबईतील वरळी येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

10 Oct, 24 06:11 PM

रतन टाटाांचा विश्वासू सहकारी शंतनू नायडूने वाहिली अखेरची श्रद्धांजली

 

 

10 Oct, 24 03:18 PM

गृहमंत्री अमित शाहंकडून रतन टाटांना श्रद्धांजली

गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गुजरातचे मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल, केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांनी रतन टाटांना श्रद्धांजली वाहिली.

10 Oct, 24 02:45 PM

आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरेंनी घेतलं टाटांच्या पार्थिवाचं दर्शन

आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरेंनी यांनी एनपीसीएमध्ये घेतलं टाटांच्या पार्थिवाचं दर्शन

10 Oct, 24 02:34 PM

भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी श्रद्धांजली वाहिली

भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही मुंबईत रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहिली.

10 Oct, 24 01:19 PM

उद्धव ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरे यांनी श्रद्धांजली वाहिली

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह आमदार आदित्य ठाकरे, अनिल देसाई आणि अरविंद सावंत यांनी उद्योगपती रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहिली.

10 Oct, 24 12:39 PM

रतन टाटा यांना भारतरत्न मिळावा यासाठी प्रस्ताव

टाटा सन्सचे मानद अध्यक्ष रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांचे नाव देशाच्या सर्वोच्च सन्मान भारतरत्नसाठी प्रस्तावित करण्यात आले आहे. शिंदे-फडणवीस सरकारने गुरुवारी हा निर्णय घेतला आहे. आज महाराष्ट्र मंत्रिमंडळाची बैठक झाली, यात ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांचे नाव भारतरत्न पुरस्कारासाठी प्रस्तावित करण्यात यावे, अशी चर्चा झाली आणि नंतर प्रस्तावित करण्यात आले. मंत्रिमंडळाच्या बैठकीत रतन टाटा यांच्या स्मरणार्थ शोक ठरावही मंजूर करण्यात आला.

10 Oct, 24 12:05 PM

केंद्रीय मंत्री पियुष गोयल झाले भावूक

केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी उद्योगपती रतन टाटा यांना श्रद्धांजली पाहिली. यावेळी बोलताना ते भावूक झाले. ते म्हणाले की, एकदा ते मुंबईत आमच्या घरी नाश्ता करण्यासाठी आले होते. नाश्त्यासाठी आम्ही त्यांना इडली, सांबार आणि डोसा दिला. त्यांनी ते आनंदाने खाल्ले. या साध्या नाश्त्याचे त्यांनी मनापासून कौतुक केले. त्यांच्यावर देशातील १४० कोटी जनतेचे प्रेम होते, असंही पियुष गोयल म्हणाले. 

10 Oct, 24 11:42 AM

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी रतन टाटा यांना आदरांजली वाहिली

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी मुंबईतील एनसीपीए लॉनमध्ये रतन टाटा यांना आदरांजली वाहिली.

10 Oct, 24 11:40 AM

RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी श्रध्दांजली वाहिली

RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी मुंबईत उद्योगपती रतन टाटा यांना श्रध्दांजली वाहिली.

10 Oct, 24 10:26 AM

रतन टाटा यांचे पार्थिव NCPAत आणले, सर्वसामान्यांना अंत्यदर्शन घेता येणार

10 Oct, 24 10:23 AM

रतन टाटा यांच्यावर वरळी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार, ४ वाजता निघणार अंत्ययात्रा

10 Oct, 24 10:19 AM

केरळचे मुख्यमंत्री पिनरई विजयन यांची रतन टाटा यांना आदरांजली

10 Oct, 24 09:52 AM

अंतिम दर्शनासाठी सचिन तेंडुलकर टाटांच्या निवासस्थानी.

रतन टाटा यांच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन घेण्यासाठी सचिन तेंडुलकर हा त्यांच्या निवासस्थानी पोहोचला आहे.

10 Oct, 24 09:25 AM

गुडबाय, माय डियर लाईटहाऊस.. टाटांसाठी शंतनू नायडूची भावूक पोस्ट

 रतन टाटा हे केवळ त्यांच्या कुशल व्यावसायिक नेतृत्वासाठीच नव्हे तर त्यांच्या महत्त्वपूर्ण परोपकारी योगदानासाठीही प्रसिद्ध होते. त्यांच्या नंतरच्या काळात, त्यांचे विश्वासू सहाय्यक शंतनू नायडू यांच्याशी त्यांच्या जवळच्या संबंधांनी लोकांचे लक्ष वेधून घेतलं आहे. रतन टाटा यांच्या निधनानंतर शंतनू यांनी सकाळी एक पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांच्या मैत्रीने माझ्या आत एक पोकळी सोडली आहे, ती भरून काढण्याच्या प्रयत्नात मी आयुष्य घालवणार आहे. दु:ख ही प्रेमाची किंमत आहे. गुडबाय, माय डियर लाईटहाऊस," असे ३० वर्षीय शंतनू नायडू यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.