Lokmat Money > बिझनेस न्यूज > नगरच्या भाविकांची त्र्यंबकेश्वर परिसरात निवास व्यवस्था सिंहस्थ कुंभमेळा: सहयोगी सेवा समितीची बैठक

नगरच्या भाविकांची त्र्यंबकेश्वर परिसरात निवास व्यवस्था सिंहस्थ कुंभमेळा: सहयोगी सेवा समितीची बैठक

अहमदनगर: नाशिक येथे होणार्‍या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी जाणार्‍या नगर शहरातील भाविकांची निवास व भोजनाची व्यवस्था सहयोगी समितीच्या वतीने श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर परिसरातील श्री पंचायत बडा उदासीन आखाड्यात करण्यात येणार आहे़ त्यासाठी येथून जाणार्‍या भाविकांची नाव नोंदणी सहयोगी सेवा समितीच्या वतीने येत्या १४ जुलै रोजी ध्वजारोहण करून केली जाणार आहे़

By admin | Published: July 12, 2015 09:58 PM2015-07-12T21:58:10+5:302015-07-12T21:58:10+5:30

अहमदनगर: नाशिक येथे होणार्‍या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी जाणार्‍या नगर शहरातील भाविकांची निवास व भोजनाची व्यवस्था सहयोगी समितीच्या वतीने श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर परिसरातील श्री पंचायत बडा उदासीन आखाड्यात करण्यात येणार आहे़ त्यासाठी येथून जाणार्‍या भाविकांची नाव नोंदणी सहयोगी सेवा समितीच्या वतीने येत्या १४ जुलै रोजी ध्वजारोहण करून केली जाणार आहे़

Situation accommodation in the Trimbakeshwar area of ​​the city: Simhastha Kumbh Mela: A meeting of the Assistant Service Committee | नगरच्या भाविकांची त्र्यंबकेश्वर परिसरात निवास व्यवस्था सिंहस्थ कुंभमेळा: सहयोगी सेवा समितीची बैठक

नगरच्या भाविकांची त्र्यंबकेश्वर परिसरात निवास व्यवस्था सिंहस्थ कुंभमेळा: सहयोगी सेवा समितीची बैठक

मदनगर: नाशिक येथे होणार्‍या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी जाणार्‍या नगर शहरातील भाविकांची निवास व भोजनाची व्यवस्था सहयोगी समितीच्या वतीने श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर परिसरातील श्री पंचायत बडा उदासीन आखाड्यात करण्यात येणार आहे़ त्यासाठी येथून जाणार्‍या भाविकांची नाव नोंदणी सहयोगी सेवा समितीच्या वतीने येत्या १४ जुलै रोजी ध्वजारोहण करून केली जाणार आहे़
नाशिक येथे होणार्‍या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सहयोग समितीची बैठक नुकतीच पार पडली़ मुख्य मार्गदर्शक हभप विश्वनाथ राऊत, वसंत लोढा, सुहास मुळे, राजकुमार जोशी, एऩ डी़ कुलकर्णी, बाळासाहेब भुजबळ, दामोधर बठेजा, अरुण ठाणगे, सुनील कुलकर्णी आदी यावेळी उपस्थित होते़
नाशिक येथे येत्या ऑगस्टपासून सिंहस्थ कुंभमेळ्यास सुरुवात होत आहे़ त्यामुळे नाशिक येथे मोठ्या प्रमाणात गर्दी होणार असून, नगर येथूनही मोठ्या प्रमाणात भाविक जातील़ त्यांच्या राहण्याची सोय नसते़ भाविकांची ही गरज लक्षात घेवून श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर परिसरात आखाड्यात भाविकांची राहण्याची व भोजनाची व्यवस्था करण्याचे ठरले आहे़ आखाड्यात भव्य असे शेड उभारण्यात येत आहे़ त्याची समितीच्या वतीने पाहणी करण्यात आली़ सभामंडपात भाविकांच्या दोन दिवसांच्या मुक्कामाची व्यवस्था करण्यात येईल़ दररोज पहाटे ४ ते ६ काकडा आरती, ८ ते ११ शिवलिंग पार्थिव रुद्राभिषेक, महाआरती, महाप्रसाद भंडारा आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे समितीच्या वतीने सांगण्यात आले़

Web Title: Situation accommodation in the Trimbakeshwar area of ​​the city: Simhastha Kumbh Mela: A meeting of the Assistant Service Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.