Join us

देशाच्या गुंतवणूक क्षेत्राची स्थिती चिंता करण्याजोगी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2020 12:43 AM

सर्वसामान्य माणसांचा पैसा प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या किती आणि कशाप्रकारे बाजारात वळत असतो, हे जर लक्षात घेतले तर या विषयाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

- चन्द्रशेखर टिळकसध्या आपल्या देशाच्या गुंतवणूक क्षेत्राची स्थिती चिंता करण्याजोगी आहे. याची महत्त्वाची तीन कारणे आहेत. पहिले म्हणजे यावर्षीचा अर्थसंकल्प सादर होण्याआधीच आपला शेअरबाजार कोणतेही संयुक्तिक कारण नसताना फार तेजीत होता. याला खाली यायला निमित्त हवेच होते. दुसरे कारण म्हणजे येस बँक प्रकरण आणि तिसरे कारण म्हणजे कोरोना...टेक्निकल अ‍ॅनालिसिसवर विश्वास ठेवणारे असे मानतात की, जर अगदी(च) थोड्या(च) दिवसांत जर शेअरबाजाराच्या निर्देशांकात जर दोनदा मोठी घसरण झाली, तर तिसरी घसरण फार लांब नसते. एकदम इजा-बिजा-तिजा.मला अशा विश्लेषणातील काहीसुद्धा कळत नाही, अगदी जरासुद्धा; पण या वेळी मलाही असं वाटते की, सोमवारी (९ मार्च) मुंबई शेअरबाजाराच्या सेन्सेक्समध्ये झालेली १९४० अंशांची घसरण आणि त्याच्यापाठोपाठ आज म्हणजे १२ मार्चला त्याच निर्देशांकात झालेली २९०० हून जास्त अंशांची उडालेली घसरगुंडी हे लक्षण काही भले नाही आणि तिसरी घसरण फारशी लांब नाही. शुभ बोल रे नाऱ्या...शेअरबाजार अनेकदा तर्कसंगत वागत नाही हे कितीही सत्य असले तरी आता आपल्या देशाच्या शेअरबाजारात आता फक्त सटोडीयेच असतात, असं नाही हीही तितकीच मोठी वस्तुस्थिती आहे.त्यातही सर्वसामान्य माणसांचा पैसा प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या किती आणि कशाप्रकारे बाजारात वळत असतो, हे जर लक्षात घेतले तर या विषयाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. धोरणकर्ते, नियंत्रक, बाजार- मध्यस्थ (मार्केट इंटरमिडिअरीज) आणि गुंतवणूकदार यापैकी कोणीसुद्धा... कारण हे म्हणजे ‘सर्व देव नमस्कार:, केशवां प्रतिगच्छती’ असं आहे. दुर्लक्ष केले तर गच्छंती अटळ! आणि सध्या देशाच्या गुंतवणूक क्षेत्राची स्थिती चिंता करण्याजोगी आहे.आजमितीला असं वाटण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे या घसरगुंडीची एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल तीन कारणे आहे. एक म्हणजे, शेअरबाजार कोणतेही संयुक्तिक कारण नसताना (संयुक्तिक हा शब्द महत्त्वाचा) फार तेजीत होता. दुसरे कारण म्हणजे येस बँक प्रकरण आणि तिसरे कारण म्हणजे कोरोना...यातले पहिले कारण देशांतर्गत अशा अर्थाने स्थानिक आहे. ते अतर्किक आहे. ते तत्कालिक आहे. त्यामुळे त्याची चर्चा करता येणे केवळ अशक्य आहे. म्हणतात ना ...‘मूड मूड होता है; उसकी वजह नही होती है.’ शुभ बोल रे नाºया!यातले दुसरे कारण म्हणजे येस बँक प्रकरण. हे स्थानिक असले तरी बहुव्यापी आहे. हे नेमके कोणाकोणाला बरोबर घेऊन बुडेल हे आता सांगणे कठीणच आहे. एक गोष्ट नक्कीच की फक्त राणा कपूर आणि त्यांचे कुटुंबीय यांच्यापुरते मोजके लोक यात भरडले जाणार नाहीत.येस बँकेचे शेअरहोल्डर हा त्याचा पहिला आणि प्रकट बळी, यांना कोणीही वाली नाही. बापजन्मात मिळणारही नाही. स्टेट बँक व रिझर्व्ह बँक या बँकेला वाचवण्याची पराकाष्ठा करत असल्याच्या बातम्या आहेत. त्या बातम्यांनुसार जी मंडळी येस बँकेत भांडवली गुंतवणूक करण्यात स्वारस्य दाखवत आहेत, ती मंडळी दहा रुपये दराने येस बँकेचे शेअर्स घेण्याची संमती देत असल्याची बातमी आहे. यात काय ते समजून घ्यायचे की, येस बँकेची स्थिती काय? शुभ बोल रे नाºया!येस बँकेचे कर्जरोखे-धारक हे त्याचे दुसरे संकटग्रस्त. त्यांना बळी म्हणायचे की नाही, हे येणारा काळ ठरवेल; पण कागदोपत्री तरी यांना वाली आहे. फक्त कागदोपत्री, व्याज काय आणि कसले?मूळ मुद्दल तरी पूर्ण परत मिळणार का? काही आर्थिक नियतकालिकांतील बातम्यांनुसार रिझर्व्ह बँकेने सुचवलेल्या तोडग्यानुसार अशा संस्थात्मक कर्जरोखेधारकांनी त्यांच्या एकूण रकमेच्या ८०-९० टक्के रकमेवर पाणी सोडावे आणि उरलेल्या १०-२० टक्के रकमेइतके येस बँकेचे शेअर्स घ्यावे, असं सुचवले आहे. सुचवले की सांगितले?कर्जरोखेधारकांना मिळणारे येस बँकेचे शेअर्सही काय मोठे आकर्षक आणि आश्वासक गुंतवणूक आहे का? हे मान्य नसल्यामुळे लार्सन अ‍ॅण्ड टुब्रोसारखे मोठे संस्थात्मक कर्जरोखेधारक न्यायालयात धाव घेण्याची शक्यता असल्याचे त्या बातम्यांत म्हटले आहे. अगदी हे न्यायालयात गेले तरी आणि न्यायालयाने अतिजलद गतीने निर्णय दिला तरी मुळात यांचे पैसे देण्याइतकी येस बँकेची आज परिस्थिती आहे का? हे नामांकित संस्थात्मक कर्जरोखेधारकांसमोर वाढून ठेवले आहे, तर लहान, वैयक्तिक. शुभ बोल रे नाºया!येस बँकेच्या मालिकेतील तिसरे आपत्तीग्रस्त म्हणजे त्याचे ठेवीधारक! पंजाब-महाराष्ट्र आणि त्याआधीही काही बँका यांच्या ठेवीदारांना जे भोगावे लागले आणि लागत आहे, तसंच येस बँकेच्या ठेवीदाराबाबत आहेच!अगदी पहिल्यापासून ५०,००० रुपये काढण्याची मुभा असली, तरी त्याचबरोबर येस बँकेत एक वेगळी तºहाही आहे. ही तºहा म्हणजे मोठे आणि संस्थात्मक ठेवीदार. इतर बँकांच्या तुलनेत मिळणारा जास्त व्याजदर आणि त्याची अत्यंत आक्रमक व आकर्षक पद्धतीने केलेली विक्री यामुळे आपल्या देशातील अनेक मोठ्या संस्था, गृहनिर्माण संस्था, सहकारी सोसायट्या, राज्य सरकारे, सरकारी कंपन्या, मोठी देवस्थाने यांच्या कोट्यवधी रुपयांच्या ठेवी येस बँकेत आहेत. काहींच्या तर हजारो कोटी रुपयांच्या. हे प्रकरण किती संवेदनशील आहे हे लक्षात घ्यायचे असेल तर एका राज्याच्या विधानसभेत याविषयी ‘स्थगन प्रस्ताव’ येऊन गोंधळ उडाला आहे, इतके सांगणे पुरेसे होईल आणि हे राज्य तथाकथित प्रागतिक-व्यावसायिकदृष्ट्या प्रगत नाही हेही इथे लक्षात घेतलेले बरे! (ज्या राज्याच्या विधानसभेत हा प्रस्ताव आला, त्या राज्यातील आणि आपल्या देशातीलही, महत्त्वपूर्ण देवस्थानच्या सुमारे १००० कोटींच्या ठेवी येस बँकेत आहेत. दुसºया राज्यातल्या तशाच एका देवस्थानने येस बँकेवरती बंधने येण्याआधी अवघे काही दिवस त्यांचे काही हजार कोटी रुपये काढून घेतले हा त्या स्थगन प्रस्तावाचा विषय होता.) शुभ बोल रे नाºया!याचे पडसाद आतापर्यंत पडले आहेतच. तिसरी घसरण जी होईल ती या वस्तुस्थितीच्या अप्रत्यक्ष परिणामातून होईल. कोरोना प्रकरणामुळे उभे राहिलेले संकट आणि संधी या दोन्हीतून मार्गक्रमणा करताना अनेक ठिकाणी पर्यायी व्यवस्था करावी लागेल. ऐन वेळी अशी पर्यायी व्यवस्था उभी करता येत नाही, असं नाही; पण त्यासाठी हाताशी तरता पैसा लागतो. असा ऐन वेळी लागेल म्हणून हाताशीच; पण बाजूला ठेवलेला पैसा जर येस बँकेच्या ठेवीत ठेवलेला असेल तर!या विषयाचा अजून एक पैलू लक्षात येऊ लागला आहे. येस बँक प्रकरणामुळे ठेवी, कर्जरोखे, शेअर्स यांत गुंतवणूक करताना, निदान काही काळ तरी, वैयक्तिक आणि संस्थात्मक असे सगळेच गुंतवणूकदार गोंधळात असतील आणि हे परवडणारे नाही. गुंतवणूकदार म्हणूनही आणि गुंतवणूक व्यवस्था किंवा अर्थव्यवस्था म्हणूनही नाही. शुभ बोल रे नाºया! (लेखक ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ आहेत.) ३्र’ं‘ू@ल्ल२’ि.ूङ्मे

टॅग्स :शेअर बाजारअर्थव्यवस्थागुंतवणूकभारत