नवी दिल्ली : एप्रिलमध्ये भारताच्या वस्तू उत्पादन (मॅन्युफॅक्चरिंग) क्षेत्राची स्थिती सलग चौथ्या महिन्यात सुधारली आहे. देशांतर्गत मागणी आणि निर्यातीत वाढ झाल्याचा लाभ या क्षेत्राला मिळाल्याचे स्थूल आर्थिक आकडेवारीवरून दिसते.
निक्केई इंडियाने जाहीर केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. निक्केई इंडियाचा मॅन्युफॅक्चरिंग पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्स (पीएमआय) एप्रिलमध्ये ५२.५ इतका राहिला. हा आकडा मार्चच्या आकड्याशी जुळणारा आहे. हा इंडेक्स ५0 च्या वर असल्यास वृद्धी दर्शवितो, तसेच ५0 च्या खाली असल्यास घसरण दर्शवितो. आयएचएस मार्केटच्या अर्थतज्ज्ञ, तसेच अहवालाच्या लेखिका पोलियाना डे लिमा यांनी सांगितले की, देशांतर्गत मागणीत झालेली वाढ, तसेच नवीन आॅर्डरींमधील निरंतर वाढ यामुळे हा इंडेक्स वर चढताना दिसत आहे.
एप्रिलमध्ये भारतीय उत्पादकांना नवा व्यवसाय मोठ्या प्रमाणात मिळाला आहे. नोटाबंदीमुळे हे क्षेत्र डिसेंबरमध्ये घसरले होते; मात्र त्यानंतर या वर्षाच्या सुरुवातीलाच त्यात तेजी दिसू लागली. त्यानंतर सलग चार महिने ते तेजीतच आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
भारताचा वृद्धीदर होऊ शकतो ७.५ टक्के
भारताचा वृद्धीदर २0१८ मध्ये वाढून ७.५ टक्के होऊ शकतो. तथापि, अमेरिकी धोरणे अधिकच संरक्षणवादी झाल्यास वृद्धीदराला १.२ टक्क्यांपर्यंत फटका बसू शकतो, असे संयुक्त राष्ट्रांच्या आशिया प्रशांत आर्थिक आणि सामाजिक परिषदेने (ईएससीएपी) म्हटले आहे.
परिषदेने म्हटले की, अमेरिकेची धोरणे प्रतिकूल राहिल्यास आशिया प्रशांत क्षेत्रातील सर्व मोठ्या अर्थव्यवस्थांची वृद्धी जास्तीत जास्त १.२ टक्क्यांनी घसरण्याचा धोका आहे. ब्रेक्झिट देशांनाही याचा फटका बसेल.
एप्रिलमध्ये सुधारली वस्तू उत्पादन क्षेत्राची स्थिती
प्रिलमध्ये भारताच्या वस्तू उत्पादन (मॅन्युफॅक्चरिंग) क्षेत्राची स्थिती सलग चौथ्या महिन्यात सुधारली आहे. देशांतर्गत मागणी आणि
By admin | Published: May 4, 2017 01:01 AM2017-05-04T01:01:14+5:302017-05-04T01:01:14+5:30