Join us

सहा लाख डेबिट कार्ड ब्लॉक

By admin | Published: October 20, 2016 6:25 AM

देशातील सर्वात मोठी बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्टेट बँक आॅफ इंडियाने सहा लाख ग्राहकांची डेबिट कार्ड्स ब्लॉक केल्याचे वृत्त आहे.

मुंबई : देशातील सर्वात मोठी बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्टेट बँक आॅफ इंडियाने सहा लाख ग्राहकांची डेबिट कार्ड्स ब्लॉक केल्याचे वृत्त आहे. एटीएममध्ये व्हायरस घुसल्याच्या भीतीने बँकेने तात्काळ डेबिट कार्ड्स ब्लॉक केल्याच सांगण्यात आले. तसेच काही कार्डांचे क्लोनिंग करून गैरव्यवहार सुरू असल्याचे बँकेला आढळून आले होते. बँकेला विविध ठिकाणाहून याबाबतच्या तक्रारी येत होत्या. त्यामुळे बँकेने तडकाफडकी डेबिट काडर््स ब्लॉक करण्याचा निर्णय घेतला. अन्य बँकांची एटीएम वापरल्याने ही समस्या उदभवल्याचे एसबीआयचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी शिवकुमार भसीन यांनी सांगितले. एसबीआय नेटवर्कमधील सर्व एटीएम मशीन्स सुरक्षित आहेत, असे ते म्हणाले. ग्राहकांचा जो डेटा आहे त्यासंदभार्तील माहितीही चुकीच्या व्यक्तीच्या हातात पडण्याची शक्यता आहे. ज्या ग्राहकांची कार्ड्स ब्लॉक झाली आहेत, त्यांनी चिंता करण्याचे कारण नाही. त्यांनी फोन बँकिग किंवा जवळच्या शाखेत ताबडतोब संर्पक साधावा, असे आवाहन स्टेट बँकेने केले आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर डेबिट कार्ड्स ब्लॉक झाल्याचा मोठाच फटका ग्राहकांना बसणार आहेत. (प्रतिनिधी)>नव्या कार्डांसाठी करावा लागणार अर्जग्राहकांना नव्या काडार्साठी अर्ज करण्यास सांगण्यात आले आहे. डेबिट कार्ड लगेच मिळत नाही. त्यासाठी काही दिवस प्रतिक्षा करावी लागते. त्यामुळे ग्राहकांना फटका बसला आहे. ज्या बँकांचे एटीएम इन्फेक्टेड आहे त्यांनी स्वत: पुढे येऊन सांगावे. हे थांबवणे केवळ त्यांच्याच हातात आहे असे भसीन यांनी सांगितले. आरबीआय संकेतस्थळावरील आकेडवारीनुसार जुलै २०१६ मध्ये एसबीआयची २० कोटी २७ लाख डेबिट कार्ड्स वापरात आहेत. त्यातील ०.२५ टक्के कार्ड्स ब्लॉक करण्यात आली आहेत.