Lokmat Money > बिझनेस न्यूज > संगणक चोरीप्रकरणी सहा जण गजाआड --------------

संगणक चोरीप्रकरणी सहा जण गजाआड --------------

अहमदनगर : संगणकाचे १८ संच, गॅस सिलिंडर, बॅटर्‍या, प्रोजेक्टर, ऑईलचे डबे आदी आठ लाख रुपयांच्या साहित्यासह सहा जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी रात्री अटक केली. त्यात साहित्य विकत घेणार्‍याचाही समावेश आहे, अशी माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिली.

By admin | Published: September 29, 2014 09:47 PM2014-09-29T21:47:06+5:302014-09-29T21:47:06+5:30

अहमदनगर : संगणकाचे १८ संच, गॅस सिलिंडर, बॅटर्‍या, प्रोजेक्टर, ऑईलचे डबे आदी आठ लाख रुपयांच्या साहित्यासह सहा जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी रात्री अटक केली. त्यात साहित्य विकत घेणार्‍याचाही समावेश आहे, अशी माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिली.

Six people charged with computer theft -------------- | संगणक चोरीप्रकरणी सहा जण गजाआड --------------

संगणक चोरीप्रकरणी सहा जण गजाआड --------------

मदनगर : संगणकाचे १८ संच, गॅस सिलिंडर, बॅटर्‍या, प्रोजेक्टर, ऑईलचे डबे आदी आठ लाख रुपयांच्या साहित्यासह सहा जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी रात्री अटक केली. त्यात साहित्य विकत घेणार्‍याचाही समावेश आहे, अशी माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिली.
स्थानिक गुन्हे शाखेचे काही पोलीस गस्तीवर असताना अरणगाव रोडवर एका मोटारसायकलवर एका पोत्यात भरलेले सामान घेऊन तिघेजण चालले होते. त्यांचा पाठलाग करीत पोलिसांनी अरणगाव येथील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेच्या आवारात तिघांना ताब्यात घेतले. शिवतेज शिवाजी जावळे (२०), अशोक अंबादास भडके (२३), दिलीप गिताराम दहातोंडे (सर्व रा. चांदा, ता. नेवासा) अशी आरोपींची नावे होती. पोत्यात हे साहित्य आढळून आले. संगणक आणि इन्र्व्हटर शाळेतून चोरल्याची आरोपींनी कबुली दिली तसेच त्यांच्या तीन सहकार्‍यांची नावे सांगितली. पोलिसांनी त्यांनाही ताब्यात घेतले. चोरलेला माल विकत घेतलेल्या अशोक सोन्याबापू वावरे (रा. नागापूर) यालाही पोलिसांनी अटक केली. नगर जिल्ह्यासह वैजापूर, गंगापूर (जि. औरंगाबाद) परिसरात केलेल्या चोर्‍यांतील हा मुद्देमाल आहे. (प्रतिनिधी)
-------------
शाळेतील संगणक चोरले
राहुरीतील छत्रपती शिवाजी हायस्कूलला गावकर्‍यांनी दिलेले दोन संगणक या चोरट्यांनी लांबविले होते. जिल्हा परिषदेच्या शाळांमधील संगणक चोरणे त्यांचे लक्ष्य होते.
----------

Web Title: Six people charged with computer theft --------------

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.