मुंबई : आयटी कंपन्यांच्या समभागांनी माना टाकल्यामुळे, मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सलग सहाव्या सत्रात घसरला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही त्यामुळे खाली आला. इन्फोसिस आणि टीसीएस या बड्या आयटी कंपन्यांच्या समभागांत मोठ्या प्रमाणात विक्री झाली, त्याचा फटका बाजाराला बसला. ३0 कंपन्यांचा सेन्सेक्स ६५.६0 अंकांनी अथवा 0.२५ टक्क्यांनी घटून २६,२४२.३८ अंकांवर बंद झाला. ७ डिसेंबरनंतरचा हा नीचांक ठरला आहे. तत्पूर्वी, गेल्या पाच सत्रांत सेन्सेक्स ३८९.८४ अंकांनी घसरला आहे. ५0 कंपन्यांचा समावेश असलेला निफ्टी २१.१0 अंकांनी अथवा 0.२६ टक्क्यांनी घसरून, ८,0६१.३0 अंकांवर बंद झाला.
सन फार्माचा समभाग सर्वाधिक घसरला. त्या खालोखाल आयटीसी, टीसीएस, विप्रो, टाटा मोटर्स, अॅक्सिस बँक, एलअँडटी, हीरो मोटोकॉर्प, इन्फोसिस, एचयूल, गेल आणि डॉ. रेड्डीज यांचे समभाग घसरले.
मारुती सुझुकी, एमअँडएम, लुपीन, एनटीपीसी, ओएनजीसी, पॉवरग्रीड, आयसीआयसीआय
बँक, अदाणी पोर्ट्स यांचे समभाग वाढल्याने सेन्सेक्सची घसरण मर्यादित राहिली. सेन्सेक्समधील ३0 पैकी १५ कंपन्यांचे समभाग घसरले. (वाणिज्य प्रतिनिधी)
सेन्सेक्सची सहाव्या सत्रातही गटांगळी
आयटी कंपन्यांच्या समभागांनी माना टाकल्यामुळे, मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सलग सहाव्या सत्रात घसरला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा
By admin | Published: December 22, 2016 12:45 AM2016-12-22T00:45:34+5:302016-12-22T00:45:34+5:30