मुंबई : जागतिक बाजारामध्ये असलेले संमिश्र वातावरण आणि कोरोनाचे वाढते रुग्ण यामुळे बाजारात निराशेचे वातावरण पसरून दिवसअखेर शेअर बाजार थोड्या प्रमाणात खाली येऊन बंद झाला.सोमवारी बाजाराचा प्रारंभ ४५० अंशांपेक्षा अधिक झाला. दिवसभरामध्ये निर्देशांकाने ८०० अंशांमध्ये चढ- उतार बघितले. दिवसअखेर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक ३१,५६१.२२ अंशंवर बंद झाला. मागील बंद निर्देशांकाच्या तुलनेत त्यामध्ये ८१.४८ अंशांची घट झाली. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा निर्देशांक (निफ्टी)मध्येही घट झाली. हा निर्देशांक १२.३० अंशांनी खाली येऊन ९,२३९.२० अंशांवर बंद झाला. बॅँकांच्या समभागांमध्ये मोठी घट झालेली दिसून आली. वाहन कंपन्यांचे समभाग वाढलेले दिसले.
शेअर बाजारामध्ये किरकोळ घट
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 12:03 AM