Lokmat Money > बिझनेस न्यूज > जुलैमध्ये मारुतीच्या विक्रीमध्ये किंचित वाढ

जुलैमध्ये मारुतीच्या विक्रीमध्ये किंचित वाढ

लॉकडाऊनचा परिणाम : अन्य कंपन्यांना मात्र फटकाच

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2020 01:20 AM2020-08-03T01:20:51+5:302020-08-03T01:21:52+5:30

लॉकडाऊनचा परिणाम : अन्य कंपन्यांना मात्र फटकाच

Slight increase in Maruti's sales in July | जुलैमध्ये मारुतीच्या विक्रीमध्ये किंचित वाढ

जुलैमध्ये मारुतीच्या विक्रीमध्ये किंचित वाढ

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी असलेल्या मारुती सुझुकीची देशांतर्गत विक्री जुलै महिन्यामध्ये १.३ टक्क्यांनी वाढली आहे. अडचणीमध्ये सापडलेल्या देशातील वाहन उद्योगासाठी ही दिलासादायक गोष्ट आहे. मात्र, देशातील अन्य वाहन उत्पादक कंपन्यांना अद्यापही विक्रीमध्ये फटका बसत आहे. मारुती सुझुकीने जुलै महिन्यातील आपल्या देशांतर्गत विक्रीची आकडेवारी जाहीर केली आहे. त्यामध्ये मागील वर्षाच्या तुलनेमध्ये १.३ टक्क्यांनी वाढ झाल्याचे स्पष्ट केले आहे. यावर्षी कंपनीने १ लाख १ हजार ३०७ वाहने विकली आहेत.

मारुतीच्या विक्रीमध्ये वाढ झाली असली तरी अन्य वाहनांच्या विक्रीमध्ये मात्र जुलै महिन्यातही घटच झाली आहे. ह्युंदाई मोटर्स (२ टक्के), महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्र (३५ टक्के), टोयोटा किर्लाेस्कर मोटर्स (४८.१२ टक्के) या कंपन्यांची विक्री कमी झाली आहे. हिरो, सुझुकी आणि रॉयल एन्फिल्ड या मोटारसायकलींच्या विक्रीमध्येही घट झाली आहे. हिरोची विक्री जून महिन्याच्या तुलनेत वाढली असली तरी मागील वर्षाच्या तुलनेत त्यामध्ये घटच होत आहे. हिरोने सुमारे ३ हजार वाहने निर्यात केली आहेत.

एमजी मोटर्सचीही वाढ
च्ब्रिटिश कंपनी असलेल्या एमजी मोटर्सची भारतामधील विक्री ४० टक्क्यांनी वाढल्याचे समोर आले आहे. जुलै महिन्यात या कंपनीने २१०४ वाहने विकली. मागील वर्षाच्या याच महिन्यातील त्यांची विक्री १५०८ वाहनांची होती. लॉकडाऊनमुळे विक्री कमी असल्याचे कंपनीने स्पष्ट केले.

Web Title: Slight increase in Maruti's sales in July

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.