नवी दिल्ली : भारतातील प्रवासी वाहनांच्या विक्रीत ऑक्टोबरमध्ये ०.२८ टक्के अशी अल्पशी वाढ झाली आहे. या महिन्यात २,८५,०२७ प्रवासी वाहने विकली गेली. गेल्या वर्षीच्या आॅक्टोबरमध्ये २,८४.२२३ प्रवासी वाहने विकली गेली होती.
‘सोसायटी आॅफ इंडियन आॅटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्स’ने (सियाम) जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशांतर्गत कार विक्रीत मात्र ६.३४ टक्क्यांची घसरण झाली आहे. १,७३,६४९ कार यंदाच्या आॅक्टोबरमध्ये विकल्या गेल्या होत्या. आॅक्टोबर, २०१८ मध्ये ही संख्या १,८५,४०० होती. मागील महिन्यात मोटारसायकलींची विक्री १५.८८ टक्क्यांनी घसरून ११,१६,९७० वर आली. आदल्या वर्षी १३,२७,७५८ मोटारसायकली विकल्या गेल्या होत्या. सर्व प्रकारच्या दुचाकींच्या विक्रीत आॅक्टोबरमध्ये १४.४३ टक्के घसरण झाली. आदल्या वर्षी २०,५३,४९७ दुचाकी विकल्या गेल्या होत्या. ही संख्या यंदाच्या आॅक्टोबरमध्ये १७,५७,२६४ वर आली.
सियामने म्हटले आहे की, व्यावसायिक वाहनांची विक्री २३.३१ टक्क्यांनी घसरून ६६,७७३ गाड्यांवर आली आहे. विविध श्रेणींतील वाहनांची विक्री १२.७६ टक्क्यांनी घसरून २१,७६,१३६ वाहनांवर आली आहे. आॅक्टोबर, २०१८ मध्ये २४,९४,३४५ वाहनांची विक्री झाली होती. प्रवासी वाहने आणि क्वॉड्रिसायकर यासारखी युटिलिटी वाहने वगळता इतर सर्व श्रेणींतील वाहनांच्या विक्रीत घसरण झाली आहे.
ऑक्टोबरमध्ये प्रवासी वाहन विक्रीमध्ये अल्प वाढ; दुचाकींच्या मागणीत मात्र घट
भारतातील प्रवासी वाहनांच्या विक्रीत ऑक्टोबरमध्ये ०.२८ टक्के अशी अल्पशी वाढ झाली आहे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 04:23 AM2019-11-12T04:23:33+5:302019-11-12T04:23:36+5:30