- प्रसाद गो. जोशी
बॅँकांच्या वाढत्या अनुत्पादक मालमत्ता, तसेच पीएनबी घोटाळ्यामुळे बॅँकांच्या कार्यप्रणालीबद्दल निर्माण झालेला संशय याच्या जोडीलाच सेवाक्षेत्रामध्ये झालेली घट आणि जागतिक शेअर बाजारांमधील मंदी या कारणांची भर पडल्याने शेअर बाजारातील घसरण सलग दुसºया सप्ताहामध्ये कायम राहिली. बाजाराचे संवेदनशील, तसेच निफ्टी हे निर्देशांक अनुक्रमे ३४ हजार आणि १० हजार ४०० अंशांच्या पातळीच्याही खाली आले.
मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक ३४०३४.२८ असा वाढीव पातळीवर खुला झाला. त्यानंतर, तो ३४०६०.१३ ते ३२९९१.१४ अंंशांदरम्यान हेलकावत सप्ताहाच्या अखेरीस ३३३०७.१४ अंशांवर बंद झाला. मागील सप्ताहाच्या बंद निर्देशांकाच्या तुलनेत त्यामध्ये ७३९.८० अंशांची म्हणजेच २.१७ टक्क्यांची घट झाली आहे. सप्ताहाच्या अखेरच्या दोन दिवसांमध्ये काही निवडक समभागांची खरेदी झाल्याने निर्देशांक वाढला, अन्यथा ही घसरण आणखी मोठी राहिली असती.
राष्टÑीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) खालच्या पातळीवर खुला झाला. सप्ताहाच्या दरम्यान तो १०४४१.३५ ते १०१४१.५५ अंशांदरम्यान फिरत होता. सप्ताहाच्या अखेरीस तो १०२२६.८५ अंशांवर म्हणजेच २३१.५० अंशांनी खाली येऊन बंद झाला. बाजाराचे क्षेत्रीय निर्देशांक असलेल्या मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्ये तीव्र घसरण दिसून आली. मिडकॅप ४७४ अंश म्हणजे २.८८ टक्के घसरून १५९८७.२७ अंशांवर, तर स्मॉलकॅप ७७९.०२ अंश म्हणजे ४.३१ टक्के खाली येऊन १७३०५.९२ अंशांवर बंद झाला. गतसप्ताहामध्ये जाहीर झालेल्या पीएमआयने सेवा क्षेत्रामध्ये मोठी घसरण झालेली दिसून आली. फेब्रुवारी महिन्यात देशातील सेवा क्षेत्र निर्देशांक ५१.१ टक्क्यांवरून ४७.८ टक्क्यांवर आला आहे. यामुळे सेवा क्षेत्रातील विविध आस्थापनांच्या समभागांना फटका बसला. धातू आस्थापना मागील सप्ताहापासूनच मंदीमध्ये आहेत. युरोपमधील व्याजदर कायम राहिले असले, तरी तेथील बाँड्सची खरेदी वाढू शकते.
गोल्ड ईटीएफमधून काढले गेले ७.७ अब्ज रुपये
बाजारातील अनिश्चितता आणि कमी परतावा, यामुळे गुंतवणूकदारांनी गोल्ड ईटीएफकडे पाठ फिरविलेली दिसत आहे. चालू आर्थिक वर्षाच्या ११ महिन्यांमध्ये गुंतवणूकदारांनी अशा योजनांमधून ७.७ अब्ज रुपयांची गुंतवणूक काढून घेतली आहे. जानेवारीपर्यंत १.१ अब्ज रुपये या फंडांमधून काढले गेले होते.
असोसिएशन आॅफ म्युच्युअल फंड इन इंडिया (अॅम्फी)ने जाहीर केल्यानुसार, गोल्ड ईटीएफच्या १४ विविध योजनांमधून फेब्रुवारी महिन्यात गुंतवणूकदारांनी ९४० दशलक्ष रुपयांची गुंतवणूक काढून घेतली आहे. मागील वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये ४६० दशलक्ष रुपये काढण्यात आले होते.
भारत सरकारने विक्रीसाठी काढलेल्या गोल्ड बाँड्सनी गोल्ड ईटीएफला मोठी स्पर्धा निर्माण केली आहे. या बाँड्सवर मिळणारे २.७५ टक्के व्याज अधिक आकर्षक वाटत असल्याने, गुंतवणूकदार त्याकडे वळत आहेत.
घसरण सुरूच; सेन्सेक्स ३४ हजारांच्या खाली
बॅँकांच्या वाढत्या अनुत्पादक मालमत्ता, तसेच पीएनबी घोटाळ्यामुळे बॅँकांच्या कार्यप्रणालीबद्दल निर्माण झालेला संशय याच्या जोडीलाच सेवाक्षेत्रामध्ये झालेली घट आणि जागतिक शेअर बाजारांमधील मंदी या कारणांची भर पडल्याने शेअर बाजारातील घसरण सलग दुसºया सप्ताहामध्ये कायम राहिली. बाजाराचे संवेदनशील, तसेच निफ्टी हे निर्देशांक अनुक्रमे ३४ हजार आणि १० हजार ४०० अंशांच्या पातळीच्याही खाली आले.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 01:15 AM2018-03-12T01:15:03+5:302018-03-12T01:15:03+5:30