Join us

Afcons Infrastructure IPOची सुस्त सुरुवात, Hyundai आयपीओ की GMP; गुंतवणूकदारांना कसली भीती?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2024 1:05 PM

Afcons Infrastructure IPO: कंपनीचा आयपीओ काल म्हणजेच २५ ऑक्टोबरला उघडला. गुंतवणूकदारांना २९ ऑक्टोबरपर्यंत या आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याची संधी मिळेल.

Afcons Infrastructure IPO: एफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या आयपीओची (Afcons Infrastructure IPO) सुस्त सुरुवात झाली. कंपनीचा आयपीओ काल म्हणजेच २५ ऑक्टोबरला उघडला. गुंतवणूकदारांना २९ ऑक्टोबरपर्यंत या आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याची संधी मिळेल. ग्रे मार्केटमध्येही प्रीमिअम पूर्वीच्या तुलनेत घसरलाय.

अ‍ॅफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या आयपीओची साईज ५४३० कोटी रुपये आहे. कंपनी आयपीओच्या माध्यमातून २.७ कोटी नवे शेअर्स जारी करणार आहे. तर ऑफर फॉर सेल अंतर्गत ९.०३ कोटी शेअर्स जारी केले जातील. ऑफर फॉर सेल अंतर्गत कंपनी ४१८० कोटी रुपये उभारण्याच्या तयारीत आहे.

पहिल्या दिवसाची सुस्त सुरुवात

अ‍ॅफकॉन्सचा आयपीओ पहिल्या दिवशी ०.१४ पट सब्सक्राइब झाला. रिटेल कॅटेगरीत सर्वाधिक ०.१५ पट सब्सक्रिप्शन होतं. तर क्वालिफाईड इन्स्टिट्युशनल बायर्स कॅटेगरीत ०.११ पट तर नॉन इन्स्टिट्युशनल इनव्हेस्टर्स कॅटेगरीत ०.१२ पट सब्सक्रिप्शन मिळालं. या सुस्त सुरुवातीमागे दोन प्रमुख कारणे आहेत. ह्युंदाईच्या आयपीओनं ज्या प्रकारे शेअर बाजारात एन्ट्री घेतली आणि दुसरं कारण म्हणजे ग्रे मार्केटमध्ये सातत्यानं घसरत चाललेला भाव.

३२ शेअर्सचा एक लॉट

अ‍ॅफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या आयपीओसाठी प्राइस बँड ४४० ते ४६३ रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आली आहे. कंपनीनं एका लॉटमध्ये एकूण ३२ शेअर्स ठेवले आहेत. त्यामुळे किरकोळ गुंतवणूकदारांना किमान १४ हजार ८१६ रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे. कंपनीच्या वतीने कर्मचाऱ्यांना एका शेअरवर ४४ रुपयांची सूट देण्यात आली आहे.

ग्रे मार्केटमध्ये मोठी घसरण

अ‍ॅफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चरचा आयपीओ आज १५ रुपयांच्या जीएमपीवर व्यवहार करत आहे. २४ ऑक्टोबरला जीएमपी ६० रुपये होता. एक दिवस आधी जीएमपी ७५ रुपये होता. तेव्हापासून ग्रे मार्केटमध्ये सातत्याने घसरण होत आहे.

(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील तज्ज्ञांचा किंवा जाणकारांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :इनिशिअल पब्लिक ऑफरिंगशेअर बाजारगुंतवणूक