Lokmat Money > बिझनेस न्यूज > स्वस्ताई संपली; मोबाईल कॉल, डाटा दर ४० ते ५० टक्के महागणार

स्वस्ताई संपली; मोबाईल कॉल, डाटा दर ४० ते ५० टक्के महागणार

भारतीय दूरसंचार क्षेत्रातील गेल्या पाच वर्षांतील पहिली दरवाढ आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2019 05:10 AM2019-12-02T05:10:58+5:302019-12-02T05:15:02+5:30

भारतीय दूरसंचार क्षेत्रातील गेल्या पाच वर्षांतील पहिली दरवाढ आहे.

The slowdown is over; Mobile calls, data rates will be 5 to 8 percent expensive | स्वस्ताई संपली; मोबाईल कॉल, डाटा दर ४० ते ५० टक्के महागणार

स्वस्ताई संपली; मोबाईल कॉल, डाटा दर ४० ते ५० टक्के महागणार

नवी दिल्ली: दूरसंचार सेवा क्षेत्रातील भारती एअरटेल, वोडाफोन आयडिया या खाजगी कंपन्यांनी तीन डिसेंबरपासून, तर रिलायन्स जियोने ६ डिसेंबरपासून दर वाढविण्याची घोषणा केल्याने मोबाईल कॉल आणि इंटरनेटचे दर ५० टक्क्यांनी वाढणार आहेत. त्यामुळे ग्राहकांना अतिरिक्त बोजा सोसावा लागणार आहे.
भारतीय दूरसंचार क्षेत्रातील गेल्या पाच वर्षांतील पहिली दरवाढ आहे. एकमेकांशी स्पर्धा करतांना चाललेल्या दरयुद्धामुळे दूरसंचार क्षेत्रातील कंपन्यावर आर्थिक संकट ओढवले आहे. व्हॉईस कॉल जवळपास मोफत झाला आहे. डाटा दरात ९५ टक्क्यांनी कपात करीत २०१४ मध्ये प्रति जीबी दर २६९ रुपयांवरुन ११ रुपये ७८ पैसे करण्यात आला होता.
भारती एअरटेल आणि वोडाफोन आयडियाने अमर्यादित श्रेणीतील नवीन दर घोषित केले आहेत. सध्याच्या प्री-पेड प्लॅनच्या जागी हे नवीन दर लागू केले जाणार आहेत. त्यामुळे या दोन्ही कंपन्याची सेवा ५० टक्क्यांनी महाग होणार आहे. रिलायन्स जिओची सेवाही ६ डिसेंबरपासून ४० टक्क्यांनी महागणार आहे. वोडाफोन आयडियाने सर्वात पहिल्यांदा प्री-पेड प्लॅन आणि सेवेसाठी नवीन दर घोषित केले. त्यानंतर भारती एअरटेलनेही आपल्या सर्व मोबाईल प्री-पेड प्लॅनचे दर वाढविण्याची घोषणा केली.
वोडाफोन आयडियाने दूसऱ्या नेटवर्क केल्या जाणाºया कॉलसाठी प्रति मिनिट ६ पैसे शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे.
रिलायन्स जियोने म्हटले आहे की, ग्राहक प्रथम या तत्त्वावर आम्ही कायम आहोत. ४० टक्के दरवाढ करण्यासोबत आम्ही ग्राहकांना अतिरिक्त ३०० टक्के फायदाही देणार आहोत. वोडाफोन आयडियाच्या निवदेनानुसार वार्षिक प्लॅनमध्ये ४१.२ टक्के वाढ केली आहे. कंपनीच्या या प्लॅनचा दर १,६९९ रुपयांवरुन २,३९९ रुपये असेल. तसेच रोज दीड जीबी डाटासह ८४ दिवसांच्या प्लॅनचा दर ३१ टक्क्यांनी वाढवून ४५८ रुपयांवरुन ५९९ रुपये केला आहे. १९९ रुपयांचा प्लॅनसाठी आता २४९ आकारले जातील.
एअरटेलचा वार्षिक प्लॅनमध्ये ४१.१४ टक्के वाढ करण्यात आल्याने यासाठी २,३९८ रुपये लागतील. मर्यादित डाटा प्लॅनसाठी आता ९८८ रुपयांऐवजी तीन डिसेंबरपासून १,४९८ रुपये ग्राहकांना मोजावे लागतील. या प्लॅनमधील ही दरवाढ ५० टक्के आहे. तसेच ८२ दिवसांच्या अमर्यादित डाटा प्लॅन आता ६९८ रुपये करुन आता हा मर्यादित डाटा प्लॅन केला आहे.

Web Title: The slowdown is over; Mobile calls, data rates will be 5 to 8 percent expensive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mobileमोबाइल