Lokmat Money > बिझनेस न्यूज > सरकारच्या मदतीने सुरू करा 'हा' सुपरहिट व्यवसाय; दरमहा होईल लाखोंची कमाई!

सरकारच्या मदतीने सुरू करा 'हा' सुपरहिट व्यवसाय; दरमहा होईल लाखोंची कमाई!

Small Business Idea: तुम्ही कमी खर्चात डिस्पोजेबल पेपर कपचा व्यवसाय सुरू करू शकता आणि जास्त नफा मिळवू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2022 02:57 PM2022-02-12T14:57:16+5:302022-02-12T14:59:13+5:30

Small Business Idea: तुम्ही कमी खर्चात डिस्पोजेबल पेपर कपचा व्यवसाय सुरू करू शकता आणि जास्त नफा मिळवू शकता.

small business idea start paper cup manufacturing business and get million monthly earn money idea | सरकारच्या मदतीने सुरू करा 'हा' सुपरहिट व्यवसाय; दरमहा होईल लाखोंची कमाई!

सरकारच्या मदतीने सुरू करा 'हा' सुपरहिट व्यवसाय; दरमहा होईल लाखोंची कमाई!

नवी दिल्ली : वाढत्या प्रदूषणामुळे केंद्र सरकारने प्लास्टिकवर बंदी घातली आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्हालाही फायदेशीर व्यवसाय करायचा असेल, तर तुमच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. तुम्ही डिस्पोजेबल पेपर कपचा व्यवसाय सुरू करू शकता. सध्या पेपर कपची मागणी खूप आहे. 

तुम्ही कमी खर्चात डिस्पोजेबल पेपर कपचा व्यवसाय सुरू करू शकता आणि जास्त नफा मिळवू शकता. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकार तुम्हाला मुद्रा योजनेअंतर्गत मदतही करत आहे. केंद्र सरकारच्या मुद्रा योजनेद्वारे या व्यवसायात तुम्हाला कर्ज मिळून शकते. 

मुद्रा कर्जाअंतर्गत सरकार व्याजावर सबसिडी देते. या योजनेंतर्गत, तुम्हाला एकूण प्रकल्प खर्चाच्या 25 टक्के रक्कम स्वतःहून गुंतवावी लागेल. मुद्रा योजनेअंतर्गत सरकार 75 टक्के कर्ज देणार आहे.

डिस्पोजेबल पेपर कपच्या व्यवसायासाठी तुम्हाला एका मशीनची आवश्यकता भासेल, जी विशेषतः दिल्ली, हैदराबाद, आग्रा आणि अहमदाबादसह अनेक शहरांमध्ये उपलब्ध आहे. अशा मशीन्स तयार करण्यासाठी इंजिनीअरिंग वर्क करणाऱ्या कंपन्या तयार करतात. 

हा व्यवसाय करण्यासाठी तुम्हाला 500 चौरस फूट जागेची आवश्यकता असेल. मशिनरी, इक्विपमेंट आणि फर्निचर, डाई, इलेक्ट्रिफिकेशन, इंस्टालेशन आणि प्री-ऑपरेटिव्हसाठी 10.70 लाख रुपयांपर्यंत खर्च येऊ शकतो. जर तुम्ही स्किल्ड आणि अनस्किल्ड दोन्ही कामगार याठिकाणी ठेवले तर तुम्हाला यावर दरमहा जवळपास 35000 रुपये खर्च होतील.

किती येऊ शकतो खर्च?
डिस्पोजेबल पेपर कपच्या व्यवसायासाठी  3.75 लाख रुपयांपर्यंत त्याच्या साहित्यावर खर्च येईल. तसेच, याच्या युटिलिटीजवर 6000 रुपयांपर्यंत खर्च येऊ शकतो. याशिवाय इतर खर्च जवळपास 20,500 रुपयांपर्यंत लागू शकतो. 

Web Title: small business idea start paper cup manufacturing business and get million monthly earn money idea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.