नवी दिल्ली – चीनच्या सरकारी वृत्तपत्रातून प्रसिद्ध झालेल्या लेखामुळे भारतीय छोट्या व्यापारांमध्ये संतापाची भावना पसरली आहे. चीनी मालावर बहिष्कार करणं भारतासाठी कठीण आहे असं चीनने म्हटलं. यावरुन भारतातील छोट्या व्यापरांची संघटना कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सनं चीनच्या आव्हानाचा स्वीकार केला आहे. देशातील व्यापारी आणि लोक मिळून चीनी मालावर बहिष्कार टाकून ते यशस्वी करुन दाखवू असा प्रतिइशारा भारताच्या व्यापारांनी दिला आहे.
सीएआयटीने सांगितले की, चीनी सरकारने वृत्तपत्राच्या आधारे भारताच्या स्वाभिमानाला आव्हान दिलं आहे. जे कधीच सहन केले जाऊ शकत नाही. चीनला याचं उत्तर देऊ. १० जूनपासून सुरु होणाऱ्या भारतीय सामान-हमारा अभियान हे आणखी तीव्रतेने देशभर राबवणार आहे. भारतीय सामान-हमारा अभियान हे सीएआयटीने चीनी मालावर बहिष्काराचं देशव्यापी अभियान सुरु केले आहे.
सीएआयटीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रविण खडेलवाल यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकल व्होकलचं जे आवाहन देशवासियांना केलं त्याला उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे त्यामुळे चीन त्रस्त झाला आहे. भारताचा रिटेल बाजार हातातून निसटत असल्याचं चीनला दिसत आहे. त्यासाठी चीनी वृत्तपत्राच्या आधारे काहीही विधानं करत आहेत. याचं उत्तर देशातील व्यापारी आणि नागरिक देतील असं सांगितले. चीनी सामान वापरणं हे भारतीयांच्या जीवनाचा भाग झालं आहे. त्यामुळे त्यावर बहिष्कार टाकणे शक्य नाही असं चीनने म्हटलं आहे.
परंतु चीनने भारतीय व्यापारांकडे दुर्लक्ष केले, भारतीय जितके वर उचलतात तितकेच खाली आपटतात, आता चीनसह जगातील अन्य देशही कशाप्रकारे भारत चीनच्या उत्पादनावर बहिष्कार टाकतो हे दाखवून देतील, फक्त डिसेंबर २०२१ पर्यंत चीनकडून १ लाख कोटी रुपयांचा आयात माल कमी होईल हे दाखवून देऊ असा इशारा व्यापारी संघटनेने दिला आहे.
काय म्हटलं होतं चीनच्या ग्लोबल टाइम्समध्ये?
चीनबाबत अनेक अफवा काही भारतीय राष्ट्रवाद करणाऱ्या नेत्यांकडून पसरवल्या जात आहेत. चीन आणि भारत यांच्यात गेल्यावर्षी ७ हजार कोटींचा व्यवहार झाला आहे. यात भारताने अनेक गोष्टी चीनमधून आयात केल्या आहेत. कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊन यामुळे दोन्ही देशाच्या अर्थव्यवस्थेवर ताण आला आहे. अशा परिस्थितीत चीनी सामानाचा विरोध करुन मध्यम वर्गीय भारतीयांच्या डोक्यावर ओझं टाकण्यासारखं आहे. कारण भारतात कमीत कमी किंमतीत चीनच्या वस्तू आयात केल्या जातात.
भारतीयांना चीनी मालाचा बहिष्कार करणे शक्य नाही, भारताचा जीडीपी ग्रोथ वाढवण्याच्या दृष्टीकोनातून हे शक्य होणार नाही. भारतीय स्मार्टफोन मार्केटमधील ७२ टक्के बाजारपेठ चीनी कंपनीच्या ताब्यात आहे. तर रोजच्या जीवनात लागणाऱ्या वस्तूंची बाजारपेठ ७०-८० टक्के चीनच्या हाती आहे. चीनी मालाचा बहिष्कार आणि विरोध करणे कठीण आहे कारण व्यापक स्वरुपात चीनी सामान भारतीयांच्या जीवनाशी जोडले आहेत, त्याला बदलणं सहज शक्य नाही असं चीनने सांगितले आहे.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
चीनची भारताला धमकी; आम्हाला फरक नाही, चीनी सामानावर बहिष्कार आणण्याचं दूरच पण...
मनसे आमदाराचा राज्य सरकारला जाब; ‘या’ प्रश्नाचं उत्तर तेव्हाही नव्हतं अन् आजही नाही
बापरे! काय सांगता, ‘या’ गावातील लोक करतायेत सापांची शेती; जगभरात गाजतंय गावाचं नाव!