नवी दिल्ली : भारतातील छोट्या व्यवसायांचे मालक (८० टक्के) हे खूपच सकारात्मक असून, त्यांना कोविड-१९ साथीनंतर त्यांचे व्यवसाय वाढतील अशी आशा आहे. ७१ टक्के लोक हे ग्राहकांचा विश्वास संपादन करण्यासाठी त्यांनी केलेल्या उपायांबाबत खूपच समाधानी आहेत. हे निष्कर्ष अमेरिकन एक्स्प्रेसतर्फे करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहेत.६३ टक्के ग्राहकांनीही असेच मत व्यक्त केले असून, तेसुद्धा सुधारणेबाबत आशावादी आहेत. कोविडच्या साथीपूर्वी ज्या प्रमाणात खरेदी होत होती तो स्तर गाठण्यासाठी पुढील ३-६ महिन्यांचा कालावधी लागेल, असा अंदाजही व्यक्त केला जात आहे.सर्वेक्षणातून समोर आलेल्या निष्कर्षांविषयी आपले मत व्यक्त करताना अमेरिकन एक्स्प्रेस बँकिंग कॉर्पोरेशन इंडियाचे एसव्हीपी आणि सीईओ मनोज अडलखा यांनी सांगितले. लॉकडाऊन शिथिल होत असतांना व्यावसायिक आणि ग्राहक दोघेही कोविडपूर्वीच्या खरेदीसाठी उत्साही आहेत.सर्वेक्षणातून देशातील छोट्या व्यावसायिकांवर होणारा परिणाम, ग्राहकांच्या बदलत्या आवडीनुसार त्यांनी व्यवसायात करण्यात येणाऱ्या बदलांचा अभ्यास करण्यात आला.कॉन्टॅक्टलेस पेमेंट आणि डिलिव्हरी पद्धती आणिसंभाषण, इन स्टोअर सुरक्षा व स्वच्छता हे घटक छोट्या व्यवसायांनी अंमलात आणण्यावर भर दिला.
राज्यात छोटे व्यावसायिक वाढीबाबत आशावादी; अमेरिकन एक्स्प्रेसचे सर्वेक्षण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2020 12:50 AM