Join us

छोट्या कंपन्यांना अधिक फटका

By admin | Published: February 23, 2016 1:52 AM

मोठ्या कंपन्यांच्या तुलनेत यावर्षी छोट्या कंपन्यांचे समभाग जास्त कोसळले आहेत. ३0 कंपन्यांचा समावेश असलेला सेन्सेक्स यंदा ९ टक्के घसरला आहे. स्मॉल कॅप आणि

नवी दिल्ली : मोठ्या कंपन्यांच्या तुलनेत यावर्षी छोट्या कंपन्यांचे समभाग जास्त कोसळले आहेत. ३0 कंपन्यांचा समावेश असलेला सेन्सेक्स यंदा ९ टक्के घसरला आहे. स्मॉल कॅप आणि मीडकॅप निर्देशांक मात्र १६.५ टक्क्यांपर्यंत घसरला आहे. त्यापैकी मीडकॅप निर्देशांक १२ टक्के घसरून ९,८0२.७७ अंकांवर आला. स्मॉलकॅप निर्देशांक १६.५६ टक्क्यांनी घसरून ९,८७६.५३ अंकांवर आला . तुलनेत सेन्सेक्स घसरणीसह २३,७0९.१५ अंकांपर्यंत खाली आला आहे. सेन्सेक्स १२ फेब्रुवारी रोजी २२,६00.३९ अंकांवर होता. हा ५२ सप्ताहांचा नीचांक ठरला होता. चीनमधील अर्थव्यवस्थेची नाजूक स्थिती, जागतिक पातळीवरील नरमाईची शंका आणि कच्च्या तेलाच्या किमतीतील घसरण ही बाजारातील घसरणीची काही प्रमुख कारणे असल्याचे जाणकार म्हणाले.