Lokmat Money > बिझनेस न्यूज > छोट्या कर्मचाऱ्यांची जातेय नोकरी, तर बडे अधिकारी होताहेत मालामाल! काय चाललंय काय?

छोट्या कर्मचाऱ्यांची जातेय नोकरी, तर बडे अधिकारी होताहेत मालामाल! काय चाललंय काय?

कोविड आणि त्यानंतर युक्रेन-रशिया युद्धामुळे जागतिक अर्थव्यवस्था मंदीच्या मार्गावर आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2022 04:26 PM2022-12-05T16:26:31+5:302022-12-05T16:27:35+5:30

कोविड आणि त्यानंतर युक्रेन-रशिया युद्धामुळे जागतिक अर्थव्यवस्था मंदीच्या मार्गावर आहे.

small employees are losing their jobs big officers are getting rich | छोट्या कर्मचाऱ्यांची जातेय नोकरी, तर बडे अधिकारी होताहेत मालामाल! काय चाललंय काय?

छोट्या कर्मचाऱ्यांची जातेय नोकरी, तर बडे अधिकारी होताहेत मालामाल! काय चाललंय काय?

कोविड आणि त्यानंतर युक्रेन-रशिया युद्धामुळे जागतिक अर्थव्यवस्था मंदीच्या मार्गावर आहे. भारतासह जगभरातील अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केलं जात आहे. ओयो, शेअरचॅट, अॅमेझॉन, ट्विटर यांनी भारतातील अनेक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं आहे. दुसरीकडे, देशातील मोठ्या कंपन्या आणि समूहांच्या CEO आणि CMD (CEO-CMD Salary Hike) यांच्या पगारात मात्र प्रचंड वाढ झाली आहे. समोर आलेल्या अहवालानुसार, कंपन्यांच्या C-suite एक्झिक्युटिव्हचा एकूण पगार ५५ टक्क्यांनी वाढून ३,९५७ कोटी रुपये झाला आहे, ज्यामध्ये सरासरी पगार सुमारे २३ कोटी रुपये इतका आहे.

देशात 'या' CMD ना सर्वाधिक पगार
सज्जन जिंदाल यांना भारतात सर्वाधिक पगार मिळाला आहे. सज्जन जिंदाल हे 'जिंदाल ग्रुप'च्या दोन कंपन्यांचे सीएमडी आहेत. आर्थिक वर्ष २०२२ मध्ये त्यांच्या पगारात ७१ टक्के वाढ झाली आहे. JSW स्टील आणि JSW Energy चे CMD सज्जन यांचा एकूण पगार १४६ कोटी रुपये आहे. जो २०२१ या वर्षात ८५ कोटी रुपये इतका होता. जिंदाल यांनी त्यांच्या प्रमुख कंपनी जेएसडब्ल्यू स्टीलकडून १३५ कोटी रुपयांचा मोठा हिस्सा घेतला आहे. ज्यामध्ये सुमारे १२२ कोटी रुपयांच्या प्रॉफिट-लिंक्ड कमिशनचा समावेश आहे.

'डेल्हीवरी'च्या MD चा पगार किती?
टॉप १० मध्ये विप्रोचे थियरी डेलापोर्ट, इन्फोसिसचे सलील पारेख, हिरो मोटोकॉर्पचे पवन मुंजाल, 'एलअँडटी'चे एसएन सुब्रह्मण्यन आणि डेल्हीवरीचे संदीप कुमार बेरासिया यांचा समावेश आहे. डेल्हीवरीचे एमडी आणि चीफ बिझनेस ऑफिसर संदीप कुमार बेरासिया यांना अंदाजे ९३ कोटी रुपयांचा पगार मिळाला आहे, ज्यामध्ये अंदाजे ६४ कोटी रुपयांच्या स्टॉक ऑप्शनच्या नफ्याचाही समावेश आहे.

सीईओंचा पगाराला मंदीची झळ नाही
कंपनीच्या वरीष्ठ कर्मचाऱ्यांना म्हणजेच एमडी आणि सीएमडींच्या पगाराला मंदीची कोणतीही झळ बसलेली नाही. गेल्या काही वर्षात भारतीय व्यवसायांचा बराच विस्तार झाला आहे आणि त्यापैकी बरेच व्यवसाय अनुभवी जागतिक अधिकारी चालवत आहेत. अनेक भारतीय कंपन्या जागतिक बाजारपेठेत चांगली स्पर्धा करण्याच्या स्थितीत आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन ५ टक्क्यांच्या जवळपास होते त्यामुळे अशा सीईओ आणि सीएमडीच्या पगारावर कोणताही परिणाम झालेला नाही. अहवालानुसार, सी-सूट एक्झिक्युटिव्हजच्या पगारात जवळपास ९१ टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर प्रवर्तक सीईओंच्या पगारात २६ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

मिलियन डॉलर पगाराच्या क्लबमधील सीईओंच्या संख्येत वाढ
वाढती महागाई, राजकीय परिस्थिती आणि कमकुवत होत असलेला रुपया अशा काळातही आर्थिक वर्ष २२ मध्ये ७.८ कोटी रुपयांपेक्षा जास्त पगार असलेल्या सीईओ/सीएक्सओच्या दशलक्ष डॉलर पगाराच्या क्लबमध्ये ३७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, FY22 मध्ये ४६ नवीन सदस्यांनी एलिट क्लबमध्ये प्रवेश केला आहे. आर्थिक वर्ष २०२१ मध्ये त्यांची संख्या १२५ इतकी होती. ज्यामध्ये आता १७ टक्क्यांची वाढ दिसून आली आहे. मिलियन-डॉलर क्लबच्या सदस्यांच्या संख्येत झालेल्या वाढीचे श्रेय स्टॉक-संबंधित नुकसान भरपाईला दिले जाऊ शकते. स्टॉक-संबंधित नुकसानभरपाई आता एकूण पॅकेजचा एक प्रमुख भाग आहे.

Web Title: small employees are losing their jobs big officers are getting rich

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.