Lokmat Money > बिझनेस न्यूज > १० कंपन्या बनल्या स्मॉल फायनान्स बँका

१० कंपन्या बनल्या स्मॉल फायनान्स बँका

वित्तीय व्यवस्थेचा विस्तार झपाट्याने करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने १० कंपन्यांना ‘स्मॉल फायनान्स बँक’ म्हणून तत्त्वत: मंजुरी दिली आहे. व्यावसायिक बँकांच्याच

By admin | Published: September 17, 2015 01:10 AM2015-09-17T01:10:26+5:302015-09-17T01:10:26+5:30

वित्तीय व्यवस्थेचा विस्तार झपाट्याने करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने १० कंपन्यांना ‘स्मॉल फायनान्स बँक’ म्हणून तत्त्वत: मंजुरी दिली आहे. व्यावसायिक बँकांच्याच

Small finance banks formed 10 companies | १० कंपन्या बनल्या स्मॉल फायनान्स बँका

१० कंपन्या बनल्या स्मॉल फायनान्स बँका

मुंबई : वित्तीय व्यवस्थेचा विस्तार झपाट्याने करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने १० कंपन्यांना ‘स्मॉल फायनान्स बँक’ म्हणून तत्त्वत: मंजुरी दिली आहे. व्यावसायिक बँकांच्याच धर्तीवर या बँकांच्या माध्यमातून ठेवी स्वीकारल्या जातील व कर्जाचेही वितरण करण्याचे अधिकार या बँकांना असतील. आज या कंपन्यांना देण्यात आलेली मंजुरी ही १८ महिन्यांसाठी असेल. या कालावधीत जर या कंपन्यांच्या बँकांनी समाधानकारक कामगिरी केली तर त्यांचा परवाना कायम होणार आहे.
लोकांपर्यंत बँकिंग सेवा पोहोचविण्याच्या दृष्टीने या बँकांची स्थापना होणार आहे. मात्र, एकूण व्यवहाराच्या १० टक्के आणि एकूण भांडवली उपलब्धीच्या १५ टक्के कर्ज वितरणाची मुभा देण्यात आली आहे. तसेच आरबीआयच्या परवानगीने या बँकांना ठराविक काळानंतर त्यांच्या व्यवहारातील मर्यादेनुसार मोठ्या बँकेत परावर्तित होण्याची मुभा असेल. या बँकांचा परवाना मिळावा म्हणून ७२ वित्तीय कंपन्यांनी अर्ज केला होता. (प्रतिनिधी)

Web Title: Small finance banks formed 10 companies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.