Lokmat Money > बिझनेस न्यूज > मोदी सरकारचं सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट, स्मॉल सेविंग स्कीमवरील व्याज ०.७० टक्क्यांनी वाढवलं!

मोदी सरकारचं सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट, स्मॉल सेविंग स्कीमवरील व्याज ०.७० टक्क्यांनी वाढवलं!

पोस्ट ऑफीसच्या स्मॉल सेविंग्ज स्कीममध्ये गुंतवणूक केल्यावर जास्त व्याज मिळणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2023 06:20 PM2023-03-31T18:20:55+5:302023-03-31T18:23:26+5:30

पोस्ट ऑफीसच्या स्मॉल सेविंग्ज स्कीममध्ये गुंतवणूक केल्यावर जास्त व्याज मिळणार आहे.

small savings schemes interest rates increased | मोदी सरकारचं सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट, स्मॉल सेविंग स्कीमवरील व्याज ०.७० टक्क्यांनी वाढवलं!

मोदी सरकारचं सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट, स्मॉल सेविंग स्कीमवरील व्याज ०.७० टक्क्यांनी वाढवलं!

पोस्ट ऑफीसच्या स्मॉल सेविंग्ज स्कीममध्ये गुंतवणूक केल्यावर जास्त व्याज मिळणार आहे. मोदी सरकारनं स्मॉल सेविंग्ज स्कीम्सवरील व्याज दरात ७० बेसिस पॉइंट्स म्हणजेच ०.७० टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. ही वाढ एप्रिल ते जून २०२३ तिमाहीसाठी केली आहे. अर्थ मंत्रालयानं ३१ मार्च २०२३ ला यासंदर्भातील एक परिपत्रक देखील जारी केलं आहे. 

ज्येष्ठ नागरिक बचत योजना, मासिक उत्पन्न बचत योजना, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र, किसान विकास पत्र, पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट आणि सुकन्या समृद्धी योजनेवरील व्याजदरात वाढ करण्यात आली आहे. 

नवे व्याज दर किती?
पोस्ट ऑफिस बचत खात्यावरील व्याजदरात कोणताही बदल नाही. त्याच वेळी, १ वर्षाच्या पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिटवरील व्याज दर आता ६.६ टक्क्यांवरून ६.८ टक्क्यांवर पोहोचला आहे. तर, २ वर्षांच्या पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट ६.८ टक्क्यांवरून ६.९ टक्के करण्यात आले आहे.

FD Rates
दुसरीकडे, ३ वर्षांच्या कालावधीसह पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिटवर आता वार्षिक ६.९ टक्क्यांऐवजी ७.० टक्के व्याज मिळेल. त्याचवेळी, ५ वर्षांच्या पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिटवरील व्याज दर ७.० टक्क्यांवरून ७.५ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. पोस्ट ऑफिसच्या पाच वर्षांच्या आवर्ती ठेवीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांना ५.८ टक्क्यांऐवजी ६.२ टक्के दराने व्याज मिळेल.

दुसरीकडे, ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांसाठी व्याज ८.० टक्क्यांवरून ८.२ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. दुसरीकडे, पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेतील व्याजदर ७.१ टक्क्यांवरून ७.४ टक्के करण्यात आला आहे. तर, सरकारने राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र म्हणजेच NSC वरील व्याजदर ७.० टक्क्यांवरून ७.७ टक्के केला आहे.

Web Title: small savings schemes interest rates increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.