Lokmat Money > बिझनेस न्यूज > PPF-सुकन्या समृद्धी सारख्या योजनांवर सरकारचा मोठा निर्णय, फटाफट व्याजदर तपासा

PPF-सुकन्या समृद्धी सारख्या योजनांवर सरकारचा मोठा निर्णय, फटाफट व्याजदर तपासा

सरकारने छोट्या बचत योजनांच्या व्याजदरात पुन्हा एकदा वाढ केली आहे. ही वाढ १० ते ३० बीपीएस पर्यंत आहे. २ वर्षांच्या मुदत ठेवीच्या दरात १० बीपीएसने वाढ करण्यात आली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2023 07:07 PM2023-06-30T19:07:21+5:302023-06-30T19:07:39+5:30

सरकारने छोट्या बचत योजनांच्या व्याजदरात पुन्हा एकदा वाढ केली आहे. ही वाढ १० ते ३० बीपीएस पर्यंत आहे. २ वर्षांच्या मुदत ठेवीच्या दरात १० बीपीएसने वाढ करण्यात आली आहे.

small savings schemes like ppf sukanya samriddhi interest rates increased upto 30 bps check detail | PPF-सुकन्या समृद्धी सारख्या योजनांवर सरकारचा मोठा निर्णय, फटाफट व्याजदर तपासा

PPF-सुकन्या समृद्धी सारख्या योजनांवर सरकारचा मोठा निर्णय, फटाफट व्याजदर तपासा

केंद्र सरकारने छोट्या बचत योजनांच्या व्याजदरात पुन्हा एकदा वाढ केली आहे. जुलै ते सप्टेंबर या तिमाहीसाठी, ही वाढ १० ते ३० बीपीएसच्या श्रेणीत आहे. अर्थ मंत्रालयाने ३० जून रोजी या संदर्भात माहिती दिली आहे. सप्टेंबर तिमाहीसाठी लहान बचत योजनांवरील व्याजदर १०-३० बीपीएसने वाढवले ​​आहेत. दोन वर्षांच्या मुदत ठेवीचा दर १० बीपीएसने वाढवला आहे. ५ वर्षांच्या आवर्ती ठेव व्याजदरात ३० बीपीएसची वाढ नोंदवली आहे.

Closing Bell: शेअर बाजारानं पकडला 'बुलेट' स्पीड, ८०३ अंकांच्या तेजीसह बंद झाला Sensex

पीपीएफ, एनएससी, किसान विकास पत्र, ज्येष्ठ नागरिक योजना, सुकन्या समृद्धी योजनेच्या व्याजदरांमध्ये कोणताही बदल झालेला नाही.

एप्रिल तिमाहीत वाढ 

एप्रिल ते जून या तिमाहीत राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) च्या व्याजदरात सर्वाधिक वाढ झाली होती. या योजनेसाठी ७.७% व्याज उपलब्ध आहे, जे पूर्वी ७% होते. मुलींसाठी असलेल्या सुकन्या समृद्धी या बचत योजनेवरील व्याज ७.६% वरून ८% करण्यात आले आहे. ज्येष्ठ नागरिक बचत योजनेचा व्याजदर ८% वरून ८.२% आणि किसान विकास पत्रासाठी ७.२% वरून ७.६% करण्यात आला आहे.

किसान विकास पत्र आता १२० महिन्यांऐवजी ११५ महिन्यांत परिपक्व होईल. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीवर म्हणजेच PPF वर ७.१% आणि बचत ठेवींवर ४% व्याज कायम ठेवण्यात आले आहे. मासिक उत्पन्न योजनेवरील व्याज ०.३ टक्क्यांनी वाढवून ७.४ टक्के करण्यात आले आहे. लहान बचत योजनांचे व्याज दर प्रत्येक तिमाहीत सुधारित केले जातात. याबाबतचा निर्णय अर्थ मंत्रालयाने घेतला आहे.

Web Title: small savings schemes like ppf sukanya samriddhi interest rates increased upto 30 bps check detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.