सध्या स्मार्ट टीव्ही वापरणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढला आहे. जर तुम्हीही नवीन स्मार्ट टीव्ही घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. Amazon आणि Flipkart वर सध्या मोठ्या डिल्स सुरू आहेत. यामध्ये तुम्ही ७,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत अनेक फिचरसह स्मार्ट टीव्ही खरेदी करू शकता. विशेष बाब म्हणजे दोन्ही ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर हे टीव्ही आकर्षक बँक ऑफर आणि एक्सचेंज बोनससह देखील खरेदी केले जाऊ शकतात. यात उत्तम आवाजासोबतच या टीव्हीमध्ये तुम्हाला एक उत्तम डिस्प्ले देखील मिळेल.
Kodak TV Rs ८,४९९ च्या किमतीसह येतो. डीलमध्ये, तुम्ही २४% डिस्काउंटनंतर ६,४९९ रुपयांमध्ये खरेदी करू शकता. बँक ऑफरमध्ये टीव्हीची किंमत आणखी ६५० रुपयांनी कमी केली जाऊ शकते. टीव्हीवर २५०० रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफरही दिली जात आहे. या TV मध्ये तुम्हाला 60Hz च्या रिफ्रेश रेट सह डिस्प्ले मिळेल. यात उच्च आवाजासाठी, तुम्हाला त्यात 20 W ऑडिओ सेटअप मिळेल.
जबरदस्त! अंबानींच्या मुलांचाही व्यवसायात डंका, आकाश अन् ईशा यांनी सांभाळली 'या' कंपनीची कमान
या टीव्हीची किंमत ९,९९९ रुपये आहे. फ्लिपकार्टच्या डीलमध्ये तुम्ही ते ६,९९९ रुपयांना खरेदी करू शकता. तुमच्याकडे Flipkart Axis Bank कार्ड असल्यास, तुम्हाला ५% कॅशबॅक देखील मिळेल. एक्सचेंज ऑफरमध्ये टीव्हीची किंमत आणखी ६ हजार रुपयांनी कमी केली जाऊ शकते. या थॉमसन टीव्हीमध्ये, तुम्हाला 20-वॅट साउंड आउटपुट आणि 60Hz रिफ्रेश रेटसह एक डिस्प्ले मिळेल. कंपनीचा हा टीव्ही लिनक्स ओएसवर काम करतो.
हा टीव्ही Amazon वर डील ऑफ द डे मध्ये उपलब्ध आहे. तुम्ही ते ६४% डिस्काउंटसह खरेदी करू शकता. टीव्हीची किंमत १५,९९९ रुपये आहे. डीलमध्ये ते ५,६९९ रुपयांना उपलब्ध असेल. बँक ऑफरमध्ये, टीव्हीची किंमत आणखी ६०० रुपयांनी कमी केली जाऊ शकते. कंपनी या टीव्हीवर २५०० रुपयांचा एक्सचेंज बोनस देखील देत आहे.
फ्लिपकार्टवर ४७% डिस्काउंटसह टीव्ही उपलब्ध आहे. त्याची एमआरपी १२,९९९ रुपये आहे,पण डीलमध्ये तुम्ही ती ६,७९९ रुपयांना खरेदी करू शकता. Flipkart Axis Bank कार्डने पेमेंट केल्यावर तुम्हाला ५% कॅशबॅक देखील मिळेल. ६,००० रुपयांपर्यंतच्या एक्सचेंज बोनससह टीव्ही देखील खरेदी केला जाऊ शकतो. टीव्ही 60Hz च्या रिफ्रेश दर आणि 16W च्या साऊंड आउटपुटसह येतो.