Join us  

अवघ्या काही सेकंदात विकला गेला हा स्मार्टफोन

By admin | Published: March 23, 2017 4:24 PM

शिओमीचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन असलेल्या Redmi 4A वर ग्राहकांच्या उड्या पडल्या आहेत. गुरुवारी या मोबाइलच्या

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 23 -  शिओमीचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन असलेल्या Redmi 4A वर ग्राहकांच्या उड्या पडल्या आहेत. गुरुवारी या मोबाइलच्या पहिल्या विक्रीला सुरुवात होताच काही सेकंदांमध्येच या व्हर्जनचे सगळे मोबाइल विकले गेले. आज दुपारी 12 वाजता अॅमेझॉन इंडिया आणि  Mi.comवर या मोबाइलची विक्री सुरू झाली त्यानंतर पुढच्या चार मिनिटांमध्येच सुमारे अडीच लाख स्मार्टफोन विकले गेल्याचे अॅमेझॉनने सांगितले. 
शिओमीच्या या मोबाइलची किंमत 5 हजार 999 रुपये असून, हा स्मार्टफोन डार्क ग्रे आणि गोल्ड कलर्समध्ये उपलब्ध आहे. आजच्या विक्रीला बंपर प्रतिसाद मिळाल्यानंतर आता या मोबाइलची पुढील विक्री 30 मार्च रोजी होणार आहे. आजच्या उद्धाटनाच्या विक्रीसाठी अॅमेझॉन इंडियाने दहा टक्के कॅशबॅकची ऑफर देखील ठेवली होती. ही ऑफर अॅमेझॉनची वेबसाइट, मोबाइल साइट आणि अॅपवरून  इंडसइंड बँकेच्या क्रेडिट वा डेबिट कार्डमधून पेमेंट करण्यावर देण्यात आली होती. या मोबाइलबाबत लोकांमध्ये फार उत्सुकता होती आणि ऑनलाइन विक्रीला सुरुवात झाल्यावर वेबसाइटला मिनिटाला सुमारे पाच मिलियन एवढ्या हिट्स मिळाल्याचे अॅमेझॉनकडून सांगण्यात आले.
शिओमीचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन असलेल्या Redmi 4A मध्ये विविध आकर्षक फिचर्स देण्यात आले आहेत. या स्मार्टफोनमध्ये 5 इंचाचा HD डिस्प्ले असणार आहे ज्याचं रेजलूशन 720 x 1280 पिक्सल्स आहे. हा अँड्रॉईड फोन 6.0 मार्शमैलोवर आधारित कंपनीच्या यूजर इंटरफेस MIUI8 वर चालतो. 
यामध्ये 1.4GHz च्या क्वॉड-कोअर स्नॅपड्रॅगन, 425 प्रोसेसरसोबत दोन जीबी रॅम उपलब्ध आहे. या स्मार्टफोनमध्ये इंटरनल मेमरी 16 जीबी असून 128 जीबी पर्यंतच मायक्रोएसडी कार्ड वापरलं जाऊ शकतं. 
Redmi 4A मध्ये बॅक कॅमेरा 13 मेगापिक्सल आहे. यामध्ये PDAF, 5 लेन्स सिस्टम, f/2.2 अपर्चर आणि LED फ्लैश आहे. फ्रंट कॅमेरा 5 मेगापिक्सल आहे. 
( शिओमीने लाँच केला Redmi 4A , जाणून घ्या किंमत आणि फीचर्स )
 
पॉलिकार्बोनेट बॉडी असणा-या Redmi 4A मध्ये ड्यूअल सीम कार्ड स्लॉट आहे. कनेक्टिव्हीटीबद्दल बोलायचं गेल्यास यामध्ये 4G VoLTE, वाय-फाय, जीपीएस, ब्लूट्यूथ आणि मायक्रो-यूएसबी सपोर्ट असणार आहे. यामध्ये 3120 mAh बॅटरी असून लवकरात लवकर चार्जिंग करण्यास मदत मिळेल.