Join us

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा स्मार्टफोन्सला जबर तडाखा; विक्रीमध्ये १८ टक्के घसरण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2021 10:24 AM

कोविड-१९ साथीच्या दुसऱ्या लाटेचा जबर फटका बसल्यामुळे एप्रिल-जून २०२१ च्या तिमाहीत भारतातील स्मार्टफोन बाजारात १३ ते १८ टक्क्यांपर्यंत घसरण झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : कोविड-१९ साथीच्या दुसऱ्या लाटेचा जबर फटका बसल्यामुळे एप्रिल-जून २०२१ च्या तिमाहीत भारतातील स्मार्टफोन बाजारात १३ ते १८ टक्क्यांपर्यंत घसरण झाली आहे.

कॅनॅलीस आणि काउंटरपॉइंट रिसर्च या संस्थांनी केलेल्या अभ्यासातून ही माहिती समोर आली आहे. २०२१ च्या पहिल्या सहामाहीत भारतीय बाजारपेठ पुन्हा उसळी घेईल, असे या संस्थांच्या अहवालात म्हटले आहे. 

कॅनॅलीसने म्हटले की, २०२१ च्या पहिल्या आणि दुसऱ्या तिमाहीदरम्यान भारतीय बाजारातील स्मार्टफोनची शिपमेंट १३ टक्क्यांची घसरून ३२.४ दशलक्ष युनिटवर आली. काउंटरपॉइंटने मात्र स्मार्टफोनच्या शिपमेंटमधील घसरण १४ ते १८ टक्के असल्याचे म्हटले आहे. काउंटरपॉइंटचे संशोधन संचालक तरुण पाठक यांनी सांगितले की, एप्रिल आणि मेमधील कामगिरी अपेक्षेपेक्षा चांगली राहिली आहे. 

टॅग्स :स्मार्टफोनकोरोना वायरस बातम्या