नवी दिल्ली - कोरोना महामारीमुळे देशातील नागरिकांचे बजेट पार कोलमडले आहे. लोकांना आर्थिक चंचणीचाही सामना करावा लागत आहे. अशातच लोकांना महागाईचा फटकाही सहन करावा लागत आहे. अनेक कंपन्यांनी पुन्हा एकदा आपल्या वस्तू, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, स्मार्ट फोन्स आदींच्या किंमतीत वाढ केली आहे. यावर्षी तब्बल तीन वेळा या वस्तूंच्या किंमतीत वाढ झाली आहे. (Smartphones, TVs, cars and refrigerators will be expensive in July month)
गेल्या आठवड्यातच मारुती सुझुकी, हिरो मोटर कॉर्प, इलेक्ट्रोनिक उत्पाद कंपन्या, सोनी, एलजी आणि गोदरेजनेही आपल्या वस्तुंच्या किंमती वाढवल्या होत्या. याशिवाय, शाओमी, रिअलमी आणि व्हिवोनेही आपल्या वस्तूंच्या किंमती वाढविण्याची घोषणा केली होती. पण याचबरोबर वस्तूंच्या वस्तूंची मागणी कमी होण्याची भीतीही कंपन्यांना आहे.
कच्च्या मालाच्या किंमती वाढल्याने वस्तूंच्या किंतीत वाढ -
माध्यमांतील वृत्तांनुसार, बाजारात कच्च्या मालाच्या किंमती मोठ्या प्रमाणावर वाढल्यानेच, वस्तूंच्या किंमतीत वाढ होत आहे. स्टिल, अल्युमिनियम, रबर, कॉपर, प्लास्टिक, रेअर मटेरिअल आणि इतर कच्च्या वस्तूंच्या किंमतीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. मोठ्या एफएमसीजी कंपन्यांचे म्हणणे आहे, की वस्तूंसाठी येणारा खर्च, पॅकेजिंग आणि लॉजिस्टिकवर अधिक खर्च झाल्यास, त्याचा थेट परिणाम दैनंदिन उपयोगी वस्तूंच्या किंमतींवरही होतो. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या बऱ्याच महिन्यांनंतर जूनमध्ये बाजार थोडा ठीक झाला होता. मात्र, वस्तू तयार करण्यासाठी अधिक खर्च आला, आणि याची किंमत वाढली तर त्याचा थेट परिणाम मागणीवर होईल. यामुळे वस्तुंची विक्रीही वाढेल, परिणाम कंपन्यांना घाटाही होऊ शकतो.
Maruti कार स्वस्तात विकत घेण्याची शेवटची संधी, पुढच्या महिन्यात वाढणार किंमती!
गत सहा मिन्यांत 3 चे 5 टक्क्यांनी वाढल्या किंमती -
अनेक कपन्यांनी गेल्या सहा महिन्यात आपल्या उत्पादनाच्या दरांत 3 ते 5 टक्क्यांनी वाढ केली आहे. भारतातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीने म्हटले आहे, की आवश्यक कच्च्या मालाच्या किंमती वाढल्याने कारच्या किंमती वाढविणे आवश्यक झाले आहे. इतर कंपन्यांनीही जवळपास असेच म्हटले आहे.
पुन्हा किंमत वाढण्याची शक्यता -
कच्च्या मालाच्या किंमतीत वाढ झाल्याने, ग्राहकांना एक जुलैपासून होम अप्लायंसेस खरेदी करणे महाग जाईल. कारण AC, TV, फ्रीज यांच्यासह इतर उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी आपल्या उत्पादनाच्या किंमती वाढविण्याची घोषणा केली आहे. यांच्या किंमतीत जवळपास 3-4 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. होम अप्लायंसेसच्या विक्रीत एप्रिल-मे 2021 दरम्यान गतवर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 20 टक्क्यांची कमी आली होती. एका रिपोर्टनुसार, होम अप्लायंसेस सेक्टरची मुख्य कंपनी बजाज इलेक्ट्रॉनिक्स जुलै ते ऑगस्टदरम्यान आपल्या सर्वच वस्तूंच्या किंमती किमान 3 टक्क्यांनी वाढविण्याच्या तयारीत आहे. याच प्रमाणे गोदरेज अप्लायंसेजदेखील दुसऱ्या तिमाहीत प्रोडक्ट्सच्या किंमती दोन वेळा 7-8 टक्क्यांपर्यंत वाढवू शकते. तज्ज्ञांनी म्हटले आहे, की कॉपर, स्टिलसह इतर मेटल्सच्या किंमती वाढल्याने होम अप्लायंसेजच्या किंमतीत वाढ झाली आहे.
टीव्हीच्या किंमतीही वाढणार...
AC तयार करणारी कंपनी ब्लू स्टारदेखील आपल्या उत्पादनाच्या किंमतीत 1 सप्टेंबर ते 5-8 टक्क्यांना वाढविण्याच्या तयारीत आहे. कंपनीने म्हटले आहे, की उत्पादनासाठी गेल्या वर्षीच्या तुलनेत 25 टक्के अधिक खर्च येत आहे. LED पॅनल आणि सेमी कंडक्टरच्या किंमती वाढल्याने TV च्या किंमतीही वाढू शकतात. सोनी कंपनीदेखील आपल्या टीव्हीच्या किंमती 12-15 टक्क्यांनी वाढविण्याची शक्यता वर्तवली जात आहे.