Join us

जीएसटीमुळे स्वस्त होतील स्मार्टफोन! सरकारचा दावा

By admin | Published: May 23, 2017 12:08 PM

जीएसटी लागू झाल्यावर स्मार्टफोन स्वस्त होतील, दावा सरकारकडून करण्यात आला आहे. त्यासंदर्भात सोमवारी केंद्र सरकारने एक पत्रक

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 23 - येत्या जुलै महिन्यापासून जीएसटीची अंमलबजावणी सुरू झाल्यावर  मोबाईलच्या किमती वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उटल जीएसटी लागू झाल्यावर स्मार्टफोन स्वस्त होतील, असा दावा सरकारकडून करण्यात आला आहे. त्यासंदर्भात सोमवारी केंद्र सरकारने एक पत्रक प्रसिद्ध करून जीएसटी लागू झाल्यानंतर वस्तूंच्या किमतींमध्ये होणारे फेरबदलांबाबत  सविस्तर माहिती दिली आहे. 
 
या पत्रकामधून सरकारने जीएसटीची अंमलबजावणी सुरू झाल्यावर नव्या करप्रणालीमध्ये सर्वसामान्य लोकांवरील अप्रत्यक्ष करांचा बोजा कसा कमी होईल, याची माहिती दिली आहे. याआधी जीएसटी लागू झाल्यावर या व्यवस्थेंतर्गत   वस्तूंच्या कमी झालेल्या किमतीचा लाभ ग्राहकांना न मिळाल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा  सरकारने कंपन्या आणि व्यापाऱ्यांना दिला होता. यासंदर्भातील वृत्त इकॉनॉमिक टाइम्सने प्रसिद्ध केले आहे. 
 
( जुलैपासून वाढेल तुमचं मोबाइल बिल, प्रिपेड टॉकटाईमही होणार कमी!
 
 मोबाईल फोन उप्तादकांनी जीएसटी लागू झाल्यावर वस्तूंच्या किमतीत वाढ होण्याचा अंदाज वर्तवला होता. मात्र सरकाने हा दावा फेटाळून लावत या प्रणातील कराचा बोजा कमी होईल, असे सांगितले आहे. इनपूट टॅक्रस क्रेडिट आणि टॅक्स रिफंडच्या लाभांमुळे किमती घटणार आहेत. इतकेच नाही तर अनेक प्रकारचे सेस आणि सरचार्जमध्ये कपात झाल्यानेसुध्या किमतींमध्ये घट होणार आहे.  
स्मार्टफोन्सच्या किमतीबाबत उत्पादकांनी केलेल्या दाव्याला प्रत्युत्तर देताना सरकारने सांगितले की सध्या स्मार्टफोन्सवर 2 टक्के सेंट्रल एक्साइट ड्युटी आणि राज्यांनुसार पाच ते 15 टक्क्यांपर्यंत व्हॅट लागतो. संपूर्ण देशात स्मार्टफोन्सवर सरासरी 12 व्हॅट आहे. म्हणजेच स्मार्टफोन्सवरील सध्याचा कर कमीत कमी सरासरी 13.5 टक्के इतका आहे. मात्र सरकाने स्मार्टफोन्सवर 12 टक्के जीएसटी आकारणे प्रस्तावित केले आहे.