Lokmat Money > बिझनेस न्यूज > स्मार्टफोन महागणार; जीएसटी १२ ऐवजी आता १८ टक्के

स्मार्टफोन महागणार; जीएसटी १२ ऐवजी आता १८ टक्के

जीएसटीएन प्रणालीची सुधारित आवृत्ती जुलै २०२०पर्यंत तयार करण्याचे आदेश जीएसटी कौन्सिलने इन्फोसिसला दिले आहेत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2020 06:15 AM2020-03-15T06:15:42+5:302020-03-15T06:16:37+5:30

जीएसटीएन प्रणालीची सुधारित आवृत्ती जुलै २०२०पर्यंत तयार करण्याचे आदेश जीएसटी कौन्सिलने इन्फोसिसला दिले आहेत

Smartphones will be expensive; now 18 % GST on Mobile | स्मार्टफोन महागणार; जीएसटी १२ ऐवजी आता १८ टक्के

स्मार्टफोन महागणार; जीएसटी १२ ऐवजी आता १८ टक्के

नवी दिल्ली : स्मार्टफोनवरील जीएसटी आता १२ टक्क्यांवरून १८ टक्के करण्याचा निर्णय जीएसटी कौन्सिलच्या शनिवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. ही वाढ १ एप्रिलपासून लागू होईल, असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे.

विमानांच्या देखभाल व दुरुस्तीवर लावण्यात येणाऱ्या जीएसटीमध्ये कपात करून तो १२ टक्क्यांवरून ५ टक्के करण्यात आला आहे. २ कोटी रुपयांपेक्षा कमी आर्थिक उलाढाल असलेल्यांपैकी ज्यांनी २०१८, २०१९ या आर्थिक वर्षांचे आयकर विवरणपत्र उशिराने दाखल केले आहे, त्यांना विलंब शुल्क माफ करण्याचा निर्णय जीएसटी कौन्सिलने घेतला आहे.

जीएसटीएन ही प्रणाली इन्फोसिसने बनविली होती. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, जीएसटीएन प्रणालीची सुधारित आवृत्ती जुलै २०२०पर्यंत तयार करण्याचे आदेश जीएसटी कौन्सिलने इन्फोसिसला दिले आहेत. त्यासाठी इन्फोसिसने कुशल कर्मचाऱ्यांची भरती करावी, असेही या कंपनीला सांगण्यात आले आहे.

Web Title: Smartphones will be expensive; now 18 % GST on Mobile

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.