दुबई - प्रवास म्हटलं की गमती जमती आल्याच, मग कधी आपल्या टीममधील एखादा माणूस पुढे जाणे किंवा मागे राहणे असो. किंवा कुठेतरी बॅग विसरणे असो. अनेकदा प्रवासात काही मजेशीर घटनाही घडतात, त्या घटना कायम आठवणीत राहतात. तसेच, काहीवेळा भातीदायक प्रसंगांचाही अनुभव येतो. मग, तुमचा तो प्रवास सायकलवरचा असू, कारमधीलमधील असो किंवा थेट विमानातीलही असो. नुकतेच एका विमान प्रवासातील प्रवाशांना अशाच एका भीतीदायक प्रसंगाला सामोरे जावे लागले. एअर इंडियाचं विमान केरळहून दुबई विमानतळावर पोहोचलं. मात्र, यादरम्यान फ्लाइटच्या कार्गो होल्डमध्ये एक साप बसलेला आढळून आला. त्यामुळे, विमानात सर्वत्र गोंधळ उडाला होता.
एअर इंडियाचं विमान बी737-800 एयरक्राफ्ट VT-AXW फ्लाइट IX-343 शनिवारी केरळच्या कालीकट येथून दुबई विमानतळावर पोहोचलं. कर्मचार्यांनी कार्गो होल्ड पाहताच यात त्यांना साप दिसला. मात्र, विमानात उपस्थित असलेल्या कोणत्याही प्रवाशाला कोणतीही हानी झाली नसल्याचं विमान प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. साप पाहिल्यानंतर विमान कर्मचाऱ्यांनी तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांना या प्रकरणाची माहिती दिली. त्यानंतर, डीजीसीएने संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
विमान कर्मचाऱ्यांनी प्रवाशांचा सामान बाहेर काढण्यासाठी कार्गो होल्ड ओपन केला होता. त्यावेळी, येथे कर्मचाऱ्यांना साप दिसला, त्यामुळे तेथील प्रवाशांमध्येही गोंधळ उडाला. मात्र, कर्मचाऱ्यांनी प्रवाशांना शांत राहण्याचे आवाहन केले, त्यानंतर संबंधित यंत्रणेला कळवून सापाला पकडण्यात आले. तसेच, वरिष्ठांनाही याबाबत माहिती देण्यात आली. आता, डीजीपीएने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच, स्थानिक यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळे हे घडल्याची चर्चा एअर इंडियात होत आहे.