Join us

...म्हणून टर्म प्लॅन घेणे आहे आवश्यक; टर्म इन्शुरन्स कधी घ्यावा? 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2022 6:34 AM

कोणताही व्यक्ती १८ वर्ष ते ६५ वर्षाच्या आतमध्ये कोणत्याही कंपनीचा टर्म इन्शुरन्स खरेदी करू शकतो

सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात अनिश्चितता आली आहे. त्यामुळे टर्म इन्शुरन्श काढणे गरजेचे झाले आहे. कुटुंबात कमवणारा एकच सदस्य असेल आणि त्याचे काही बरेवाइट झाले तर अशा स्थितीत टर्म इन्शुरन्स घरातील इतर सदस्यांना आर्थिक मदतीचा हातभार देतो. तुम्ही अतिशय कमी प्रिमीअममध्ये जास्तीत जास्त विमा कवच घेऊ शकता.

या गोष्टी कधी विसरू नकाथेट इन्शुरन्स देणाऱ्याकडून ॲानलाइन टर्म इन्शुरन्स प्लॅन खरेदी करावा. यामध्ये ब्रोकरच्या कमिशनची बचत होते.दीर्घ कालावधीसाठीचा टर्म प्लॅन घ्या. कमी कालावधीचा प्लॅन घेतला तर कव्हर कमी आणि नुकसान अधिक होते. वार्षिक उत्पन्नाच्या २० पट अधिक कव्हर असलेला टर्म प्लॅन खरेदी करा.वेगवेगळ्या कंपन्यांचे टर्म प्लॅन कंम्पेअर करा. यातील सर्वात स्वस्त प्रिमीअर आणि अधिक सुविधा असलेला टर्म प्लॅन खरेदी करा. टर्म प्लॅन खरेदी करताना अनेक प्रकराचे राइडर घेणे टाळा.

कोणत्या वयात खरेदी करावे ?कोणताही व्यक्ती १८ वर्ष ते ६५ वर्षाच्या आतमध्ये कोणत्याही कंपनीचा टर्म इन्शुरन्स खरेदी करू शकतो. मात्र सध्या नोकरीच्या सुरुवातीलाच टर्म प्लॅन घेणे अतिशय फायदेशीर ठरते. यामध्ये कमी प्रिमीअममध्ये अधिक रकमेचा टर्म इन्शुरन्स घेता येतो. अधिक कव्हरेज मिळते. टर्म प्लॅन लाइफ इन्शुरन्स प्लॅन आहे. यामुळे कमी प्रिमीअममध्ये अधिक रकमेचे कव्हरेज मिळते. अंडोमेंट प्लॅनमध्ये अधिक प्रिमीअम द्यावा लागतो आणि टर्म प्लॅनच्या तुलनेत कमी रकमेचे कव्हरेज मिळते.

...म्हणून टर्म प्लॅन घेणे आहे आवश्यकटर्म प्लॅन एक साधा लाइफ इन्शुरन्स प्रोडक्ट असते. यामध्ये व्यक्तीचा अचानक मृत्यू झाल्यास कुटुंबातील इतर सदस्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण केल्या जातात. मृत्यू झाल्यानंतर कुटुंबाला एकरकमी मोठी रक्कम मिळते. यातून कुटुंबाचा आर्थिक गाडा, मुलांचे शिक्षण आरामात करता येते.