चंद्रकांत दडसउपसंपादक
कुटुंबाची जबाबदारी असलेला ३५ वर्षांचा मुलगा जर अचानक अपघातात गेला तर त्या कुटुंबावर किती मोठे संकट कोसळेल? मात्र, त्याचवेळी समजा तर त्या तरुणाने १ कोटींचा टर्म इन्शुरन्स काढून ठेवला असेल तर? त्यामुळेच तुम्ही टर्म इन्शुरन्सचा विचार करण्याची गरज आहे.
टर्म इन्शुरन्स म्हणजे काय?
टर्म इन्शुरन्स तुमच्या कुटुंबासाठी सुरक्षित भविष्याची हमी आहे. या इन्शुरन्समुळे तुमचा अचानक मृत्यू झाल्यास तुमच्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य मिळते. १ कोटीचा टर्म इन्शुरन्स हा मोठ्या रकमेचा विमा आहे असे अनेकांना वाटू शकते; पण त्यामुळे आपले जे काही उत्पन्न गेले आहे. त्याची भरपाई, कर्जफेड आणि भविष्यातील खर्च भागवण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.
कुणासाठी महत्त्वाचा?
तुमच्या गैरहजेरीत कुटुंबाची आर्थिक तारांबळ होऊ द्यायची नसेल तर गृहकर्ज, व्यवसाय कर्ज किंवा इतर आर्थिक जबाबदाऱ्या असतील तर. जे पालक मुलांसाठी उच्च शिक्षण, लग्न, आर्थिक स्थैर्य देण्याची स्वप्ने पाहतात.
फायदे काय?
भविष्यातील सर्व आर्थिक गरजा पूर्ण करू शकतो. मोठे कव्हरेज असूनही तुलनेने स्वस्त प्रीमियम. कलम ८० सी अंतर्गत कर सवलत मिळते. तुमच्या कुटुंबाचा भविष्यकाळ सुरक्षित राहतो. यामुळे मन:शांती मिळते.