Join us

...तर तुम्हाला मिळेल शून्य डाॅलर पगार; इलाॅन मस्क यांनी ट्विटर संचालक मंडळाला दिली थेट ‘धमकी’

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2022 12:30 PM

ट्विटरला वाचवण्यासाठी संचालक मंडळाने पॉयझन पिलची बचावात्मक रणनीती अवलंबली असली तरी मस्क भूमिकेवर ठाम आहेत.

न्यूयॉर्क : इलॉन मस्क यांनी आता ट्विटरच्या बोर्ड सदस्यांवर निशाणा साधला आहे. एका ट्विटला प्रत्युत्तर देताना मस्क म्हणाले की, जर त्यांची बाजी यशस्वी झाली,तर ट्विटर बोर्डाला शून्य डॉलर्स पगार मिळतील याशिवाय ट्विटर दरवर्षी किमान ३ दशलक्ष डॉलर वाचवेल.

 ट्विटरला वाचवण्यासाठी संचालक मंडळाने पॉयझन पिलची बचावात्मक रणनीती अवलंबली असली तरी मस्क भूमिकेवर ठाम आहेत.  मस्क यांनी कंपनीला ४३ अब्ज डॉलरमध्ये विकत घेण्याची ऑफर दिली आहे. ट्विटरने जाहीर केले की, ते कंपनीच्या १५ टक्क्यांहून अधिक स्टॉक असलेल्या शेअरधारकांना संचालक मंडळाच्या मंजुरीशिवाय सवलतीच्या दरात शेअर्स खरेदी करण्याची परवानगी देईल.

रणनीती काय आहे? - ट्विटरच्या संचालक मंडळाने एकमताने मस्कची ऑफर नाकारण्यासाठी आर्थिक जगात पॉयझन पिल (विषाची गोळी) म्हणून ओळखले जाणारे बचावात्मक धोरण स्वीकारले आहे. पॉयझन पिलला “अधिकार योजना” असेही म्हणतात. - पॉयझन पिलच्या रणनीतीमध्ये कंपनीचा स्टॉक अनावश्यकपणे महाग करून बाहेरील व्यक्तीला डिल कमी आकर्षक बनवली जाते. 

टॅग्स :एलन रीव्ह मस्कट्विटर