Lokmat Money > बिझनेस न्यूज > ShareChat मध्ये पुन्हा एकदा कर्मचारी कपात, यावेळी ‘इतक्या’ कर्मचाऱ्यांना दिला नारळ

ShareChat मध्ये पुन्हा एकदा कर्मचारी कपात, यावेळी ‘इतक्या’ कर्मचाऱ्यांना दिला नारळ

ShareChat Layoffs: मोठ्या मोठ्या टेक कंपन्यांनंतर भारतीय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म शेअरचॅटनं मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात केली आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2023 11:32 AM2023-01-16T11:32:33+5:302023-01-16T11:33:05+5:30

ShareChat Layoffs: मोठ्या मोठ्या टेक कंपन्यांनंतर भारतीय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म शेअरचॅटनं मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात केली आहे. 

social media platform ShareChat cuts staff 500 employees once again this time non performing | ShareChat मध्ये पुन्हा एकदा कर्मचारी कपात, यावेळी ‘इतक्या’ कर्मचाऱ्यांना दिला नारळ

ShareChat मध्ये पुन्हा एकदा कर्मचारी कपात, यावेळी ‘इतक्या’ कर्मचाऱ्यांना दिला नारळ

भारतातील सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ShareChat ने पुन्हा एकदा कर्मचारी कपात  केली आहे. यापूर्वी कंपनीनं आपलं फॅटसी गेमिंग प्लॅटफॉर्म बंद करून ५ टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं होतं. आता पुन्हा एकदा कंपनीनं कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. इकॉनॉमिक टाईम्सच्या रिपोर्टनुसार यावेळी जवळपास ५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना कामावरुन काढण्यात येत असल्याचे म्हटले आहे.. या कर्मचारी कपातीत अशा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे जे नॉन परफॉर्मर होते अशी माहितीही समोर आली आहे.

गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात कंपनीनं १०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं होतं. “आम्हाला कंपनीच्या दृष्टीनं आपल्या इतिहासातील काही कठीण आणि मोठे निर्णय घ्यावे लागले आहेत. अविश्नसनीय रित्या आम्हाला आमच्या कर्मचाऱ्यांपैकी २० टक्के कर्मचाऱ्यांना जाऊ द्यावं लागत आहे, जे या स्टार्टअपच्या प्रवासात आमच्या सोबत होते. आम्ही हा निर्णय अतिशय विचारपूर्वक घेतला आहे,” असं कंपनीच्या प्रवक्त्यांनी सांगितलं. 

कर्मचाऱ्यांना हे बेनिफिट्स
बाजाराकडे पाहता यावेळी गुंतवणूकीसाठी अतिशय सतर्क राहायला हवं. लाईव्ह स्ट्रीमिंग आणि जाहिरातींद्वारे कमाई दुप्पट व्हावी असे कंपनीचे प्रयत्न आहेत. तर नोकरीवरून काढलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या नोटीस पीरिअडमधील पूर्ण वेतन, कंपनीशी जोडलेल्या प्रत्येक वर्षासाठी दोन आठवड्यांचं वेतन आणि डिसेंबर २०२२ पर्यंत व्हेरिएबल पे ची १०० टक्के रक्कम मिळेल. 

Web Title: social media platform ShareChat cuts staff 500 employees once again this time non performing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.