Join us

कहाणी रसनाची : ६० देशांपर्यंत पोहोचली, आता कंपनीविरोधात दिवाळखोरीचा अर्ज मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2023 12:00 PM

पाहा नक्की काय आहे हे प्रकरण....

अहमदाबादच्या राहणाऱ्या अरीज पिरोजशॉ खंबाटा यांनी १९७६ मध्ये एक सॉफ्ट ड्रिंक तयार केलं आणि हे झटपट तयार करता येत होतं. त्यांनी असा एक युनिक रेडी टू सर्व्ह कॉन्सन्ट्रेट सॉफ्ट ड्रिंक तयार केलं आणि त्याचं नाव ठेवलं जाफे. निराळं नाव असल्यानं ते लोकांमध्ये तितकं प्रसिद्ध होऊ शकलं नव्हतं. त्यामुळे त्यांनी नाव बदलण्याचा निर्णय घेतला. १९७९ मध्ये त्यांनी याचं नाव बदलून रसना असं केलं. याचा अर्थ आहे ज्युस.

नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलनं एका ऑपरेशनल क्रेडिटरला ७१ लाख रूपयांचा भरणा न दिल्यानं रसना विरोधात दिवाळखोरीचा अर्ज स्वीकार करण्यात आलाय. अहमदाबादच्या नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनललनं शुक्रवारी लॉजिस्टिक कंपनी भारत रोड कॅरियरद्वारे सुरू केलेल्या कारवाईत रसना प्रायव्हेट विरोधात दिवाळखोरीचा अर्ज स्वीकार केलाय. ट्रिब्युनलनं रविंद्र कुमार गोयल यांना अंतरिम रिझॉल्युशन प्रोफेशनल म्हणून नियुक्त केलंय. अखेर नक्की काय झालं रसना सोबत.

जबरदस्त मार्केटिंग स्ट्रॅटेजी घराघरात रसना पोहोचवणारे अरीज पिरोजशॉ खंबाटा हे सध्या या जगात नाहीत. त्यांनी ७० च्या दशकात असा वेळी रसना बाजारात आणलं जेव्हा सॉफ्ट ड्रिंक्स मोठ्या किंमतींना विकली जात होती. यामुळेच त्यांचं हे ड्रिंक फार प्रसिद्ध झालं आणि घराघरात पोहोचलं. त्यांनी हे ड्रिंक सामान्यांमध्ये हिट करण्यासाठी जबरदस्त मार्केटिंग स्ट्रॅटेजी तयार केली होती.

५ रुपयांत ३२ ग्लासत्या काळात रसनाच्या ५ रुपयांच्या पॅकेटमध्ये ३२ ग्लास सॉफ्ट ड्रिंक तयार करता येत होती. त्यांच्या जाहिरातीत याचा वापर करण्यात आला आणि हे सुपरहिट ठरलं. किंमत आणि निराळ्या टेस्टमुळे रसना लोकांमध्ये प्रसिद्ध होऊ लागले. रसनाच्या एका ग्लासची किंमत केवळ १५ पैसे पडत होती. रसना प्रसिद्ध होण्यामागे दूरदर्शनवर येणाऱ्या त्याच्या जाहिराती कारण ठरल्या. आय लव्ह यू रसना अशी पंचलाईन त्यांनी तयार केली होती. अनेक भारतीय सेलिब्रिटी रसनाचे ब्रँड अँबेसेडर बनले. यामध्ये तरुणी सचदेवा, अनुपम खेर, ऋतिक रोशन, कपिल देव, परेश रावल, जेनेलिया डिसुझा आणि विरेंद्र सहवाग यांचा समावेश होता.

आता नक्की काय झालंभारत रोड क‌ॅरिअरनं रसना समर ड्रिंकच्या उत्पादकांच्या विरोधात कॉर्पोरेट इन्सॉल्व्हन्सी रेझॉल्युशन प्रोसिडिंग सुरू करण्याची मागणी करत २०१९ मध्ये अर्ज दाखल केला होता. कंपनीचे जवळपास ७१.३ लाख रुपये थकित असल्याचा दावा त्यांनी केला. कोरोना महासाथीच्या पूर्वीची ही थकबाकी असल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान, यासाठी आयबीसी २०१६ च्या कलम १० ए चा ते आधार घेऊ शकत नाही असं एनसीएलटीनं म्हटलं. भारत रोडनं रसनासाठी अनेक सामानांची वाहतूक केली आहे. ज्याच्यासाठी त्यांनी एप्रिल २०१७ ते ऑगस्ट २०१८ या कालावधीत अनेक इनव्हॉईस तयार केल्याचं त्यांनी सांगितलं. रसनाचं मॅनेजमेंट या दिवाळखोरीच्या अर्जाच्या मंजुरीविरोधात एनसीएलटीमध्ये आव्हान देणार असल्याची माहिती त्यांनी झी बिझनेसशी बोलताना दिली.

टॅग्स :व्यवसायअहमदाबाद