टोकियो : भारतात येत्या पाच ते दहा वर्षांत दूरसंचार व इंटरनेट क्षेत्रातील मोठी कंपनी सॉफ्टबँक १० अब्ज अमेरिकन डॉलरची गुंतवणूक करणार आहे.सॉफ्टबँक ही जपानची एक मोठी मोबाइल कॅरिअर कंपनी असून, अमेरिकेतील स्प्रिंट कॉर्पोरेशनमध्ये तिची भागीदारी आहे. सॉफ्टबँक भारतात सौरऊर्जा प्रकल्पात ३५० दशलक्ष अमेरिकन डॉलरची गुंतवणूक करणार आहे, असे बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मासायोशी सोन यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. आम्ही आधीच दोन अब्ज अमेरिकन डॉलर भारतात गुंतविले असून, आम्हाला आणखी गुंतवणूक करण्याची इच्छा आहे. भारताला चांगले भवितव्य आहे. भारतात इंटरनेट कंपन्यांमध्ये व सौरऊर्जा प्रकल्पांत गुंतवणूक करण्याचीही आमची इच्छा आहे, असे त्यांनी सांगितले. भविष्यात वेगाने गुंतवणूक व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत, असे सोन म्हणाले. आम्ही पहिले पाऊल टाकले ते सौरऊर्जेमध्ये. भारतात सौरऊर्जेच्या पहिल्या प्रकल्पात आम्ही ३५० दशलक्ष अमेरिकन डॉलरची गुंतवणूक करणार आहोत. ती आम्ही विस्तारणार आहोत. येत्या पाच ते दहा वर्षांत आम्ही १० अब्ज अमेरिकन डॉलर गुंतविणार आहोत, असे ते म्हणाले.
सॉफ्टबँक गुंतविणार भारतात ३५० अब्ज डॉलर
By admin | Published: May 31, 2016 6:05 AM