Join us

इलेक्ट्रिक वाहनांसाठी भेल उभारतेय सौर चार्जर नेटवर्क

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2019 4:17 AM

विद्युत (इलेक्ट्रिक) वाहनांसाठी दिल्ली-चंदीगढ महामार्गावर सौर ऊर्जेवर चालणारे चार्जर नेटवर्क उभारण्याचे काम सरकारी मालकीची कंपनी ‘भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लि.’कडून (भेल) सुरू आहे.

नवी दिल्ली : विद्युत (इलेक्ट्रिक) वाहनांसाठी दिल्ली-चंदीगढ महामार्गावर सौर ऊर्जेवर चालणारे चार्जर नेटवर्क उभारण्याचे काम सरकारी मालकीची कंपनी ‘भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लि.’कडून (भेल) सुरू आहे. कंपनीच्या वतीने ही माहिती देण्यात आली.फेम योजनेअंतर्गत हा प्रकल्प उभारला जात आहे. भारतात हायब्रीड व विद्युत वाहनांचा वापर आणि उत्पादन जलद गतीने वाढावे यासाठी ही योजना आखली आहे. भेलने मुंबई शेअर बाजारात सादर केलेल्या नियामकीय दस्तावेजात म्हटले आहे की, दिल्ली आणि चंदीगढ शहरांना जोडणाऱ्या संपूर्ण २५0 कि. मी. महामार्गावर विद्युत वाहनांसाठी (ईव्ही) ठराविक अंतरावर चार्जर्सची सुविधा निर्माण करण्यात येत आहे.

टॅग्स :इलेक्ट्रिक कार