Lokmat Money > बिझनेस न्यूज > सोलार कंपनीचा IPO येणार, GMP मध्ये आतापासूनच ₹१२८० चा फायदा; काय आहे प्राईज बँड?

सोलार कंपनीचा IPO येणार, GMP मध्ये आतापासूनच ₹१२८० चा फायदा; काय आहे प्राईज बँड?

Waaree Energies IPO: कंपनीचा आयपीओ २१ ऑक्टोबरपासून गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. हा आयपीओ २३ ऑक्टोबरपर्यंत खुला राहिल. पाहा काय आहे याची प्राईज बँड आणि काय आहे ग्रे मार्केटमधील स्थिती

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2024 11:19 AM2024-10-16T11:19:09+5:302024-10-16T11:19:28+5:30

Waaree Energies IPO: कंपनीचा आयपीओ २१ ऑक्टोबरपासून गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. हा आयपीओ २३ ऑक्टोबरपर्यंत खुला राहिल. पाहा काय आहे याची प्राईज बँड आणि काय आहे ग्रे मार्केटमधील स्थिती

Solar company Waaree Energies IPO soon to launch GMP gains rs 1280 from now What is a prize band know status | सोलार कंपनीचा IPO येणार, GMP मध्ये आतापासूनच ₹१२८० चा फायदा; काय आहे प्राईज बँड?

सोलार कंपनीचा IPO येणार, GMP मध्ये आतापासूनच ₹१२८० चा फायदा; काय आहे प्राईज बँड?

Waaree Energies IPO: सोलार कंपनी वारी एनर्जीजचा आयपीओ २१ ऑक्टोबरपासून गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. हा आयपीओ २३ ऑक्टोबरपर्यंत खुला राहिल. आयपीओमध्ये वारी एनर्जीजच्या शेअरची किंमत १५०३ रुपये निश्चित करण्या आली आहे. आयपीओ सुरू होण्यापूर्वीच कंपनीच्या शेअर्सनी ग्रे मार्केटमध्ये उच्चांक गाठलाय. ग्रे मार्केटमध्ये वारी एनर्जीजचे शेअर्स ८५ टक्क्यांहून अधिक प्रीमियमवर ट्रेड करत आहेत. हे शेअर्स २८ ऑक्टोबरला बीएसई आणि एनएसईवर लिस्ट होतील.

वारी एनर्जीज लिमिटेडचा ४,३२१.४४ कोटी रुपयांचा आयपीओ २१ ऑक्टोबर रोजी सब्सक्रिप्शनसाठी खुला होणार आहे. या ऑफरचा प्राइस बँड १,४२७ ते १,५०३ रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आलाय. प्रत्येक लॉटमध्ये ९ शेअर्स ठेवण्यात आलेत. वारी एनर्जीजच्या आयपीओमध्ये ३,६०० कोटी रुपयांचे २.४ कोटी नवीन शेअर्स जारी केले जातील. तसंच ७२१.४४ कोटी रुपयांचे ४८ लाख शेअर्स ऑफर फॉर सेल अंतर्गत उपबल्ध असतील.

अॅक्सिस कॅपिटल, आयआयएफएल सिक्युरिटीज, जेफरीज इंडिया, नोमुरा फायनान्शियल अॅडव्हायझरी अँड सिक्युरिटीज, एसबीआय कॅपिटल मार्केट्स, इंटेन्सिव्ह फिस्कल सर्व्हिसेस आणि आयटीआय कॅपिटल या कंपन्या या इश्यूच्या लीड मॅनेजर आहेत. लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड रजिस्ट्रार आहे.

Waree Energies IPO चा राखीव हिस्सा

कंपनीचे प्रमोटर हितेश चिमणलाल दोशी, वीरेन चिमणलाल दोशी, पंकज चिमणलाल दोशी आणि वारी सस्टेनेबल फायनान्स प्राइव्हेट लिमिटेड आहेत. IPO मध्ये ५० प्रतिशत हिस्सा क्वालिफाइड इंस्टीट्यूशनल बायर्ससाठी, ३५ टक्के हिस्सा रिटेल इनव्हेस्टर्ससाठी आणि १५ प्रतिशत हिस्सा नॉन इंस्टीट्यूशनल इनव्हेस्टर्ससाठी राखीव असेल.

GMP १२८० रुपयांवर

ग्रे मार्केटमध्ये वारी एनर्जीजचा शेअर १२८० रुपयांच्या प्रीमियमवर व्यवहार करत आहे. आयपीओमध्ये कंपनीच्या शेअरची किंमत १५०३ रुपये आहे. सध्याच्या ग्रे मार्केट प्रीमियमचा (GMP) विचार करता वारी एनर्जीजचे शेअर्स २७८३ रुपयांच्या आसपास बाजारात लिस्ट होऊ शकतात. म्हणजेच ज्या गुंतवणूकदारांना आयपीओमध्ये वारी एनर्जीजचे शेअर्स मिळतील, त्यांना लिस्टिंगच्या दिवशी ८५ टक्क्यांहून अधिक नफा होऊ शकतो.

(टीप : यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Solar company Waaree Energies IPO soon to launch GMP gains rs 1280 from now What is a prize band know status

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.