Lokmat Money > बिझनेस न्यूज > १ एप्रिलपासून काही महाग, काही स्वस्त

१ एप्रिलपासून काही महाग, काही स्वस्त

नवीन आर्थिक वर्षापासून म्हणजेच उद्या, १ एप्रिलपासून काही वस्तू महाग तर काही स्वस्त होणार आहेत

By admin | Published: March 31, 2017 12:34 AM2017-03-31T00:34:09+5:302017-03-31T00:34:09+5:30

नवीन आर्थिक वर्षापासून म्हणजेच उद्या, १ एप्रिलपासून काही वस्तू महाग तर काही स्वस्त होणार आहेत

Some expensive, some cheap from 1st April | १ एप्रिलपासून काही महाग, काही स्वस्त

१ एप्रिलपासून काही महाग, काही स्वस्त

नवी दिल्ली : नवीन आर्थिक वर्षापासून म्हणजेच उद्या, १ एप्रिलपासून काही वस्तू महाग तर काही स्वस्त होणार आहेत. पान-मसाला, सिगारेट, चांदीच्या वस्तू, हार्डवेअर, सिल्व्हर फॉइल, चांदीचे दागिने, स्टीलचे सामान आणि स्मार्टफोन महाग होतील, तर नैसर्गिक गॅस, निकल, बायोगॅस, नायलॉन, सौरऊर्जा बॅटरी आणि पॅनल स्वस्त होतील.


काय होणार स्वस्त

घर
रेल्वे तिकीट खरेदी
मध्यम वर्गाला टॅक्समध्ये सूट,
लेदर सामान,
नैसर्गिक गॅस
निकल
बायोगॅस
नायलॉन
सौरऊर्जा बॅटरी
व पॅनल
पवन चक्की
आरओ आदींच्या किमती काहीशा कमी होऊ शकतील.


काय होणार महाग

पानमसाला आणि गुटख्यावर उत्पादन शुल्क १0 वरून १२ टक्के होईल. तसेच सिगारेटवरील उत्पादन शुल्क प्रति हजाराला जे २१५ रुपये आहे, ते ३११ रुपये होईल. त्यामुळे दोन्हींच्या किंमती वाढणे अपरिहार्य आहे.
कार, मोटारसायकल आणि कमर्शियल वाहनांचा विमा १ एप्रिलपासून महाग होईल. त्या विम्याच्या दरात ५0 टक्के वाढ अपेक्षित आहे.
मोबाइल हँडसेट तयार करण्यासाठी लागणाऱ्या सर्किट बोर्डवर सीमा शुल्क लागेल. ते आधी नव्हते. त्यामुळे मोबाइल महाग होऊ शकतील.एलईडी ब्लब तयार करण्यासाठी लागणाऱ्या सामग्रीवर सीमा शुल्क आणि ६ टक्के प्रतिपूर्ती शुल्क लागेल.
त्यामुळे एलईडी बल्बही महाग होणार आहेत. अ‍ॅल्युमिनियमवर ३० टक्के आयात शुल्क लावण्यात आले आहे. त्यामुळे अ‍ॅल्युमिनियमचे सर्व पदार्थ महाग होतील.

Web Title: Some expensive, some cheap from 1st April

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.