Lokmat Money > बिझनेस न्यूज > Google Pay वापरकर्ते झाले मालामाल! कंपनीने ८० हजारांपर्यंत रिवॉर्ड पाठवले, पण आता...

Google Pay वापरकर्ते झाले मालामाल! कंपनीने ८० हजारांपर्यंत रिवॉर्ड पाठवले, पण आता...

काही Google Pay वापरकर्त्यांच्या खात्यावर Google ने चुकून काही Google Pay ८० हजार रुपयांपर्यंतचे बक्षीस पाठवले होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2023 04:42 PM2023-04-10T16:42:01+5:302023-04-10T16:43:14+5:30

काही Google Pay वापरकर्त्यांच्या खात्यावर Google ने चुकून काही Google Pay ८० हजार रुपयांपर्यंतचे बक्षीस पाठवले होते.

some google pay users got more than 80k as reward company says its a glitch | Google Pay वापरकर्ते झाले मालामाल! कंपनीने ८० हजारांपर्यंत रिवॉर्ड पाठवले, पण आता...

Google Pay वापरकर्ते झाले मालामाल! कंपनीने ८० हजारांपर्यंत रिवॉर्ड पाठवले, पण आता...

Google Pay मध्ये एका त्रुटीमुळे गोंधळा उडाला होता. या बिघाडामुळे काही भाग्यवान वापरकर्त्यांना ८० हजार रुपये मिळाले होते. सोशल मीडियावरील अनेक वापरकर्त्यांनी Google Pay वर १० ते १००० डॉलर्स मिळल्याची चर्चा झाली होती. इलॉन मस्क यांनी गुगल पे अॅपमध्ये दिल्या जाणार्‍या मोठ्या रिवॉर्ड्सवर देखील लक्ष ठेवले होते. ट्विटरवर इलॉन मस्क यांनीही गुगल पेच्या बातमीला कमेंट करुन छान असं लिहिले होतं. ट्विटरवर एका वापरकर्त्याने त्याचा अनुभव शेअर केला. त्याने स्क्रीनशॉट शेअर करुन लिहिले की, त्यांना Google कडून ४६ डॉलर सुमारे ३,७७० रुपयेचे बक्षीस मिळाले आहे.

रेखा झुनझुनवाला सूसाट... Tata 'या' च्या दोन शेअर्समुळे अवघ्या 15 मिनिटांत कमावले 400 कोटी

गुगल पे उघडताच त्यांना बक्षीस मिळाल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी, लोक त्यांच्या Google Pay मध्ये रिवॉर्ड तपासू शकतात हे देखील त्यांनी सांगितले आहे. गुगल पे ओपन केल्यानंतर डील्स टॅबवर जा असे त्यांनी सांगितले. येथे तुम्हाला सूचीतील रिवॉर्डवर टॅप करावे लागेल. हे फक्त त्याच्यासोबतच घडले नाही, तर Reddit वर देखील, अनेक वापरकर्त्यांनी Google Pay वर प्रचंड बक्षिसे मिळाल्याबद्दल लिहिले आहे. त्यांनी स्क्रीनशॉट देखील शेअर केले आहेत.

यावर अनेकांनी पोस्ट करुन पैसे  मिळाल्याचा दावा केला आहे. एका वापरकर्त्याने पोस्ट केले आहे की, त्याला Google Pay कडून  १०७२ डॉलर म्हणजेच सुमारे ८७,८६५ रुपये बक्षीस मिळाले आहे. मात्र, आता ही प्रक्रिया थांबली असून, आता या प्रकाराचे रिवॉर्ड कोणालाच मिळत नाही. आता कंपनीने याला त्रुटी असल्याचे म्हटले आहे. रहमान नावाच्या एका ट्विटर यूजरने ईमेलचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. त्यात लिहिले आहे, 'हा ईमेल तुम्हाला पाठवला जात आहे कारण तुमच्या Google Pay खात्यात चुकून रोख रक्कम जमा झाली आहे. या समस्येचे आता निराकरण करण्यात आले आहे आणि शक्य असेल तेथे पैसे परत घेण्यात आले आहेत. 

Google Pay खात्यातून रिवॉर्डचे पैसे वापरणार्‍या वापरकर्त्यांसाठी काळजी करण्याची काहीच गरज नाही. कारण ज्यांनी या रिवॉर्डचा वापर केला आहे त्यांना काहीही करण्याची गरज नसल्याचे गुगलने म्हटले आहे. ज्या वापरकर्त्यांकडून Google ने अद्याप ते बक्षीस परत केले नाही अशा वापरकर्त्यांच्या खात्यातून पैसे कापले जाणार नाहीत आणि ते रिवॉरर्डचे पैसे ठेवू शकतात. Google यावर कोणतीही कारवाई करणार नाही.

Web Title: some google pay users got more than 80k as reward company says its a glitch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.