Join us  

जीएसटीतील काही ठळक व्याख्या

By admin | Published: January 21, 2017 4:43 AM

पहिल्या भागात म्हणल्याप्रमाणे कर कायद्यातील काही महत्त्वाच्या शब्दांचा नेमका अर्थ काय?

-अ‍ॅड. विद्याधर आपटेपहिल्या भागात म्हणल्याप्रमाणे कर कायद्यातील काही महत्त्वाच्या शब्दांचा नेमका अर्थ काय? या प्रश्नाला त्या शब्दाची जी व्याख्या केली आहे तो अर्थ असे उत्तर देता येईल. म्हणूनच आपण काही विशिष्ट शब्दांच्या व्याख्या आणि त्यांचा अर्थ ‘जीएस्टी’ कायद्यांसाठी काय असेल ते पाहणार आहोत. हिल्या भागात म्हणल्याप्रमाणे कर कायद्यातील काही महत्त्वाच्या शब्दांचा नेमका अर्थ काय? या प्रश्नाला त्या शब्दाची जी व्याख्या केली आहे तो अर्थ असे उत्तर देता येईल. म्हणूनच आपण काही विशिष्ट शब्दांच्या व्याख्या आणि त्यांचा अर्थ ‘जीएस्टी’ कायद्यांसाठी काय असेल ते पाहणार आहोत.>एकत्रित उलाढाल (अ‍ॅग्रीगेट टर्नओव्हर) : यात एखाद्या व्यक्तीने करपात्र, बिगरकरपात्र, सवलतपात्र, निर्यात वस्तू आणि / किंवा सेवा यांची भारतात कुठेही केलेली सर्व उलाढाल गृहित धरली जाईल. मात्र त्यावर जीएसटी, आयजीएसटी अथवा एसजीएसटी कायद्याने लावलेली करांची रक्कम धरली जाणार नाही. तसेच एकत्रित उलाढाल या व्याख्येत ज्या वस्तू आणि सेवांवर उलट करप्रणाली अंतर्गत (रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम) पुरवठा किंमत, तसेच अंतर्भूत पुरवठा (इनवर्ड सप्लाय) यांची किंमत धरली जाणार नाही. हंगामी करपात्र व्यक्ती (कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन) म्हणजे जिला व्यवसायाचे कायमचे ठिकाण नसून, वस्तू आणि / किंवा सेवा पुरवठ्याचे व्यवहार जी कधी तरीच मूळ मालक अथवा दलाल म्हणून करते. एकत्रित पुरवठा (कम्पोझिट सप्लाय) ज्यामध्ये दोन किंवा त्यापेक्षा अधिक वस्तूंचा वा सेवांचा पुरवठा होतो किंवा वेगळे करता येण्यासारखा अथवा वेगळे करता न येण्यासारख्या वस्तू व सेवांचा एकत्रित पुरवठा व्यावसायिक कारणासाठी केला जातो. वस्तूंचा प्रवाही पुरवठा (कन्डिशनल सप्लाय आॅफ गुड्स) : एखाद्या कराराद्वारे वस्तूचा पुरवठा /सतत किंवा एका मागून एक केला जात असेल आणि ज्यासाठी पुरवठादार वस्तूचे बिल नेहमीसारखे किंवा ठराविक कालावधीने वस्तू घेणाऱ्याला देत असेल तर त्याला वस्तूंचा प्रवाही पुरवठा म्हटले जाते. ज्यामध्ये तारेतून, केबलमधून पाइपलाइनमधुन किंवा अन्य प्रवाही मार्गे किंवा कशाही वस्तू पुरवल्या जातात. सेवांचा प्रवाही पुरवठा (कन्डिशनल सप्लाय आॅफ सर्व्हिसेस) : एखाद्या कराराद्वारे तीन किंवा अधिक महिन्यांसाठी सेवा पुरवठादाराकडून ज्या सेवा दिल्या जातात किंवा देण्याचे कबूल केले जाते अथवा सतत दिली जाते, ज्यामध्ये ठराविक कालावधीनंतर, टप्प्याटप्प्याने सेवा घेणारा पैसे देईल अशी अट असते, त्याला सेवेचा प्रवाही पुरवठा असे म्हटले जाते.सवलत पुरवठा (एक्झेम्प्ट सप्लाय) : ज्या वस्तू व सेवांचा पुरवठा करपात्र नाहीत आणि ज्या वस्तू व सेवांच्या पुरवठ्याचा उल्लेख कायद्याच्या परिशिष्टामध्ये केला जाईल किंवा ज्यांच्यासाठी येऊ घातलेल्या कायद्यातील कलमाद्वारे सवलत जाहीर केली जाईल.