Join us  

काही वस्तू हाेणार स्वस्त तर काहींचे भाव वाढणार! ९ सप्टेंबरला जीएसटी परिषदेची बैठक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2024 1:35 PM

केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासह सर्व राज्यांचे वित्तमंत्री बैठकीला उपस्थित असतील.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: वस्तू व सेवा कर (जीएसटी) परिषदेची ५४ वी बैठक ९ सप्टेंबर २०२४ रोजी होणार असून, या बैठकीत जीएसटी कर टप्प्यांची (स्लॅब) पुनर्रचना केली जाऊ शकते, अशी माहिती हाती आली आहे. जीएसटी परिषदेच्या वतीने समाजमाध्यम मंच ‘एक्स’वर बैठकीची माहिती जारी करण्यात आली आहे. त्यानुसार, जीएसटी परिषदेची आगामी बैठक नवी दिल्लीत होणार आहे. केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासह सर्व राज्यांचे वित्तमंत्री बैठकीला उपस्थित असतील.

स्लॅब तर्कसंगत करणार?

  • बैठकीत जीएसटीचे दर तर्कसंगत बनविण्याच्या मुद्यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. 
  • करांच्या टप्प्यांत बदल, शुल्कात बदल करणे हे निर्णय होऊ शकतात. 
  • जीएसटी दर व्यवहार्य करण्यासाठी बिहारचे उपमुख्यमंत्री सुमंत चौधरी यांच्या नेतृत्वाखाली एका मंत्रिगटाची स्थापन करण्यात आली आहे.
टॅग्स :जीएसटीनिर्मला सीतारामन