Lokmat Money > बिझनेस न्यूज > नाेकरी गेलेल्यांनी लढविली शक्कल अन् मिळू लागल्या पटापट नाेकऱ्या 

नाेकरी गेलेल्यांनी लढविली शक्कल अन् मिळू लागल्या पटापट नाेकऱ्या 

कंपनीने काढल्यानंतर अनेक जण झाले साेशल मीडियावर व्यक्त

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2023 08:18 AM2023-02-20T08:18:29+5:302023-02-20T08:19:12+5:30

कंपनीने काढल्यानंतर अनेक जण झाले साेशल मीडियावर व्यक्त

Some people have even got jobs after watching 'Lay-off vlogs' on social media | नाेकरी गेलेल्यांनी लढविली शक्कल अन् मिळू लागल्या पटापट नाेकऱ्या 

नाेकरी गेलेल्यांनी लढविली शक्कल अन् मिळू लागल्या पटापट नाेकऱ्या 

वाॅशिंग्टन : टेक कंपन्यांनी गेल्या काही महिन्यांमध्ये अमेरिकेत माेठी कर्मचारी कपात केली आहे. त्यांना नवा व्हिसा मिळविण्यासाठी नवी नाेकरी ६० दिवसांच्या आत मिळणे आवश्यक आहे. अशावेळी अनेकजणांनी या कर्मचाऱ्यांना आधार देण्यासाठी पुढाकार घेतला. त्यातून एक संकल्पना उदयास आली ती म्हणजे ‘ले-ऑफ व्लाॅग्स’ची. अनेकांनी आपले अनुभव मांडणारे व्हिडीओ साेशल मीडियावर शेअर केले आहेत.

त्यातून पुढे काय करावे, या प्रश्नांची उत्तरे मिळत असून, संकटसमयी धीर देण्याचे काम या व्लाॅगच्या माध्यमातून हाेत आहे. विशेष म्हणजे, हे व्हिडीओ पाहून या लाेकांना नाेकऱ्यादेखील मिळत आहेत. केवळ अल्फाबेट, ॲमेझाॅन, मेटा, मायक्राेसाॅफ्ट इत्यादी कंपन्यांनीच ५० हजारांपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना काढले आहे. या कर्मचाऱ्यांमध्ये दाेन प्रकारचे लाेक आहेत. एक गट कंपनीच्या धाेरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे, तर दुसरा गट यामध्ये नवी संधी शाेधत आहे. हे लाेक प्रसंगाला धैर्याने सामाेरे गेले.  

व्लाॅग्सने तारले
साेशल मीडियावर हे व्लाॅग्स पाहून काही जणांना नाेकऱ्यादेखील मिळाल्या आहेत. त्यात टार्गेट, सिप्टाॅल, स्वीटग्रीन यांसारख्या कंपन्या आघाडीवर आहेत. 

कर्मचारी कपातीचे चित्र
९० लाखांहून अधिक कर्मचारी काढले हाेते २००८ मधील मंदीच्या काळात
३० लाखांहून अधिक कर्मचारी काढले हाेते २०२० मधील काेराेना महामारीत

व्हिडीओ पाहून उमेदवाराला सहजपणे समजू शकताे. त्यामुळे कंपन्या त्यांना नाेकरी देत आहेत. जुन्या कंपनीच्या नावाने ओरडणाऱ्यांना नाेकरी मिळणे कठीण आहे. - जाेनाथन झेव्हियर, संस्थापक, व्हाेनसल्टिंग 

Web Title: Some people have even got jobs after watching 'Lay-off vlogs' on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.