Join us

भारतात काहीतरी मोठे घडणार आहे...; हिंडनबर्गचे ट्विट, उद्योगविश्वात खळबळ, सोमवारी शेअर बाजार...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2024 9:51 AM

Hindenburg Research Warning for India: हिंडनबर्गच्या या शक्यतेचा शेअर बाजारावरही मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. 

वर्षभरापूर्वी अदानींचे साम्राज्य हादरवून सोडणाऱ्या हिंडनबर्ग रिसर्चने आज पुन्हा एका भारतीय कंपनीबाबत मोठा खुलासा करणार असल्याचे संकेत दिले आहेत. भारतात लवकरच काहीतरी मोठे घडणार आहे, असे हिंडनबर्गने एक्सवर पोस्ट केली आहे. 

अमेरिकी शॉर्ट सेलर फर्म हिंडनबर्ग रिसर्चने कोणती कंपनी, काय होणार आहे हे विस्तृतपणे सांगितलेले नाही. हिंडनबर्ग रिसर्च पुन्हा एकदा एका भारतीय कंपनीबाबत मोठा खुलासा करणार आहे, एवढेच यातून स्पष्ट होत आहे. यामुळे भारतीय उद्योग विश्वात मोठी खळबळ उडाली आहे. हिंडनबर्गच्या या शक्यतेचा शेअर बाजारावरही मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. 

जानेवारी २०२३ मध्ये हिंडनबर्गने अदानी समुहाच्या हेराफेरीवरून गौप्यस्फोट केले होते. यामुळे शएअर बाजारात भूकंप झाला होता. यामुळे अदानी जगातील २ नंबरच्या अब्जाधीश पदावरून थेट ३६ व्या क्रमांकावर गेले होते. यानंतर काही महिन्यांनी पुन्हा अदानी ग्रुपच्या शेअरमध्ये गुंतवणूकदारांचा विश्वास वाढू लागला होता. अदानी ग्रुपचे बाजारमुल्य ८६ अब्ज डॉलरपर्यंत कमी झाले होते. अमेरिकन इन्व्हेस्टमेंट रिसर्चने अदानी समूहावर कॉर्पोरेट जगतातील सर्वात मोठी फसवणूकीचा आरोप केला होता. रिपोर्टमध्ये अदानी समूहावर शेअर्समध्ये फेरफार आणि अकाउंटिंग फ्रॉडचा आरोप करण्यात आला होता.

या प्रकरणी हिंडनबर्गला सेबीने नोटीसही पाठविली होती. हिंडनबर्गने कोटक महिंद्रा बँकेबाबतही असाच खुलासा केला होता. तेव्हा देखील कोटकच्या शेअर मुल्यात मोठी घसरण झाली होती. आता कोणत्या कंपनीचा नंबर लागणार आहे, याची धाकधुक कंपन्यांच्या मालकांबरोबरच शेअर बाजारातील गुंतवणूकदारांमध्येही लागून राहिली आहे. 

टॅग्स :अदानीशेअर बाजारअमेरिका