Lokmat Money > बिझनेस न्यूज > सोन्याने ओलांडला २९ हजारांचा पल्ला

सोन्याने ओलांडला २९ हजारांचा पल्ला

जागतिक बाजारात असलेला उठाव आणि स्थानिक सराफांकडून असलेली मागणी यामुळे सोने शुक्रवारी ५४० रुपयांनी वधारून २९,२९० रुपये प्रति १० ग्रॅम झाले

By admin | Published: February 20, 2016 02:44 AM2016-02-20T02:44:01+5:302016-02-20T02:44:01+5:30

जागतिक बाजारात असलेला उठाव आणि स्थानिक सराफांकडून असलेली मागणी यामुळे सोने शुक्रवारी ५४० रुपयांनी वधारून २९,२९० रुपये प्रति १० ग्रॅम झाले

Sona crossed over 29 thousand feet | सोन्याने ओलांडला २९ हजारांचा पल्ला

सोन्याने ओलांडला २९ हजारांचा पल्ला

नवी दिल्ली : जागतिक बाजारात असलेला उठाव आणि स्थानिक सराफांकडून असलेली मागणी यामुळे सोने शुक्रवारी ५४० रुपयांनी वधारून २९,२९० रुपये प्रति १० ग्रॅम झाले. त्याचबरोबर चांदीही ३७५ रुपयांनी वधारून ३७,४७५ रुपये प्रति किलो झाली.
येथील सराफा बाजारात ९९.९ आणि ९९.५ या दोन्ही शुद्धतेच्या सोन्याचे भाव ५४० रुपयांनी वाढून अनुक्रमे २९,२९० रुपये आणि २९,१४० रुपये प्रति १० ग्रॅम झाले. यापूर्वी १३ फेब्रुवारी रोजी सोन्याने हा स्तर गाठला होता. जागतिक बाजारात न्यूयॉर्क येथे सोने १.८५ टक्क्यांनी वधारून १,२३०.७० अमेरिकी डॉलर प्रति औंस, तर चांदी ०.७५ टक्क्यांनी वधारून १५.३८ अमेरिकी डॉलर प्रति औंस झाले.कारखानदार आणि नाणे उत्पादकांकडून मागणी वाढल्याने चांदीही ३७५ रुपयांनी वधारली. त्यामुळे चांदीचा भाव ३७४७५ रुपये प्रति किलो झाला. चांदीच्या नाण्याचे भाव मात्र स्थिर राहिले. १०० नाण्यांच्या खरेदीचा भाव ५४ हजार रुपये, तर विक्रीचा ५५ हजार रुपये कायम राहिला.

Web Title: Sona crossed over 29 thousand feet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.