Join us

SONY कंपनीचा मायक्रोसॉफ्टसोबत व्रिक्रीचा करार, जाणून घ्या व्हायरल सत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2020 10:17 PM

मायक्रोसॉफ्टच्या या डीलसोबत सोनीचा मोबाईल व्यापार, पेटंट, कॅमेरा, व्हिडीओ आणि टेलिव्हिजनवरील काम आदी आता मायक्रोसॉफ्टचे झाले. एवढेच नाही तर व्हिडीओ गेमचे प्लेस्टेशनही मायक्रोसॉफ्टच्या ताब्यात गेल्याचे सांगण्यात आले होते

ठळक मुद्देमायक्रोसॉफ्टच्या या डीलसोबत सोनीचा मोबाईल व्यापार, पेटंट, कॅमेरा, व्हिडीओ आणि टेलिव्हिजनवरील काम आदी आता मायक्रोसॉफ्टचे झाले. एवढेच नाही तर व्हिडीओ गेमचे प्लेस्टेशनही मायक्रोसॉफ्टच्या ताब्यात गेल्याचे सांगण्यात आले होते

सरत्या वर्षाची गोळाबेरीज कोरोनाने त्रस्त असलेली जनता करत असताना एक जुनी आणि स्मार्टफोन बाजारात अस्तित्वासाठी धडपडणारी मोठी कंपनी विकली गेल्याचे वृत्त काही माध्यमांत झळकले होते. मायक्रोसॉफ्टने वर्षाचे दोन दिवस शिल्लक असताना ही कंपनी विकत घेतली किंवा सोनीने मायक्रोसॉफ्टसोबत भागिदारी केल्याचे वृत्त होते. मात्र, सोनी कंपनीने ना कंपनी विकली, ना कुणाशी भागिदारी केली. सोनी संदर्भात सोशल मीडियावर व्हायरल झालेले वृत्त खोट असल्याचं हिंदुस्तान टाइम्सने म्हटलंय.

मायक्रोसॉफ्टच्या या डीलसोबत सोनीचा मोबाईल व्यापार, पेटंट, कॅमेरा, व्हिडीओ आणि टेलिव्हिजनवरील काम आदी आता मायक्रोसॉफ्टचे झाले. एवढेच नाही तर व्हिडीओ गेमचे प्लेस्टेशनही मायक्रोसॉफ्टच्या ताब्यात गेल्याचे सांगण्यात आले होते. स्पॅनिश पोर्टल मायक्रोसॉफ्टर्सवरुन ईएन 24 या वेबसाईटने इंग्रजीत हे वृत्त भाषांतरीत करुन प्रकाशित केल होते. मात्र, हे वृत्त अद्याप निरर्थक आहे. 

एक्सचेंज 4 मीडियाने यासंदर्भात सर्वप्रथम वृत्त दिले होते. मात्र, काही वेळातच या पोर्टलने वेबसाईटवरुन ही बातमी हटवली आहे. विशेष म्हणजे कुठल्याही नामांकित मीडियाने अधिकृतपणे हे वृत्त दिले नाही. तसेच, या डीलसंदर्भात मायक्रोसॉफ्ट किंवा सोनी यापैकी एकाही कंपनीने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर यासंदर्भात माहिती दिली नाही. त्यामुळे जोपर्यंत अधिकृत वृत्त येत नाही, तोपर्यंत या कराराच्या बातम्या देणं चुकीचं ठरणार आहे. त्यामुळे, हे वृत्त खोट ठरतं, असेही हिंदुस्तान टाइम्सने म्हटलंय.  

टॅग्स :सोनी मराठीव्यवसाय