Join us  

लवकरच, तयार रहा! एअरटेल, जिओ रिचार्जच्या किंमती वाढविणार, किती? कधी....

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2023 10:31 PM

सध्या फाईव्ह जी हे फोरजी च्या रिचार्जवरच दिले जात आहे. यासाठी २४० रुपयांच्या वरच्या प्लॅन्सवर हे दिले जात आहे. ५जी मुळे अनलिमिटेड आणि सुपरफास्ट इंटरनेट स्पीड मिळत आहे. 

रिलायन्स जिओ आणि एअरटेलने भारतात फाईव्ह जी सुरु करून आता बरेच महिने झाले आहेत. या कंपन्यांनी आता निमशहरी भागातही कव्हरेज द्यायला सुरुवात केलीय. या साऱ्या घोडदौडीत या दोन्ही कंपन्या त्यांच्या रिचार्ज प्लॅन्सचे दर वाढविणार असल्याची बातमी आली आहे. यामुळे लवकरच, तयार रहा महागलेली रिचार्ज करण्यासाठी असे म्हणावे लागणार आहे. 

रिचार्ज दरवाढीबाबत अद्याप वेगवेगळ्या बातम्या येत आहेत. यानुसार एअरटेलजिओ रिचार्ज प्लॅनमध्ये १० टक्क्यांची वाढ करण्याची शक्यता आहे. यामुळे २०० रुपयांचा प्लॅन २२० रुपयांना मिळणार आहे. तर १००० रुपयांचा प्लॅन ११०० रुपयांना मिळणार आहे. 

जिओ व एअरटेलकडून यंदाच्या अखेरच्या तिमाहीमध्ये रिचार्ज प्लॅन महाग केले जाण्याची शक्यता आहे. याला वेळ असला तरी डिसेंबर ते जानेवारीमध्ये रिचार्ज प्लॅनच्या दरात वाढ केली जाणार आहे. व्होडाफोन आयडियाने अद्याप ५जी लाँच केलेले नसले तरी ही कंपनी देखील दर वाढविण्याची शक्यता आहे. एअरटेल, जिओ ४जी चे प्लॅन वाढवेल सोबतच ५जी ची रिचार्जदेखील लाँच करण्याची शक्यता आहे. कारण येत्या डिसेंबरपर्यंत दोन्ही कंपन्यांचा देशभर फाईव्ह जीचे जाळे पसरविण्याचा प्लॅन आहे. 

सध्या फाईव्ह जी हे फोरजी च्या रिचार्जवरच दिले जात आहे. यासाठी २४० रुपयांच्या वरच्या प्लॅन्सवर हे दिले जात आहे. ५जी मुळे अनलिमिटेड आणि सुपरफास्ट इंटरनेट स्पीड मिळत आहे. 

टॅग्स :जिओएअरटेलरिलायन्स जिओ