Lokmat Money > बिझनेस न्यूज > मस्तच! एटीएममधून कार्डशिवाय काढा पैसे, रिझर्व्ह बँकेची घोषणा; कार्ड क्लोनिंगद्वारे होणारी फसवणूक थांबणार

मस्तच! एटीएममधून कार्डशिवाय काढा पैसे, रिझर्व्ह बँकेची घोषणा; कार्ड क्लोनिंगद्वारे होणारी फसवणूक थांबणार

डिजिटल फसवणूक रोखण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआयने) शुक्रवारी उपाययोजना जाहीर केल्या.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2022 07:18 AM2022-04-09T07:18:50+5:302022-04-09T07:19:22+5:30

डिजिटल फसवणूक रोखण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआयने) शुक्रवारी उपाययोजना जाहीर केल्या.

Soon make cashless card withdrawals across all banks and ATM networks using UPI | मस्तच! एटीएममधून कार्डशिवाय काढा पैसे, रिझर्व्ह बँकेची घोषणा; कार्ड क्लोनिंगद्वारे होणारी फसवणूक थांबणार

मस्तच! एटीएममधून कार्डशिवाय काढा पैसे, रिझर्व्ह बँकेची घोषणा; कार्ड क्लोनिंगद्वारे होणारी फसवणूक थांबणार

मुंबई :

डिजिटल फसवणूक रोखण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआयने) शुक्रवारी उपाययोजना जाहीर केल्या. या अंतर्गत, रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना एटीएममधून कार्डशिवाय (कार्डलेस) पैसे काढण्याची सुविधा सुरू करण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे अनेक प्रकारे होणारी फसवणूक टाळता येणार आहे.

सध्या एटीएममधून कार्डलेस रक्कम काढण्याची सुविधा देशातील काही बँकांकडूनच दिली जात आहे. ही सुविधाही ग्राहकांना तेव्हाच मिळते, जेव्हा ते संबंधित बँकेचे एटीएम वापरतात. मात्र, आता या सेवेचा विस्तार करण्यात येणार आहे.

द्विमासिक पतधोरणाची घोषणा करताना, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले, आता यूपीआय वापरून सर्व बँका आणि एटीएम नेटवर्कवर कार्डलेस रोख पैसे काढण्याच्या सुविधेचा प्रस्ताव आहे.  कार्डलेस कॅश काढण्याच्या सुविधेमुळे कार्ड स्किमिंग, क्लोनिंग यांसारख्या गोष्टींना आळा बसेल.

...असे काढा पैसे
कार्डविना एटीएममधून रक्कम काढण्यासाठी मोबाइल ॲपचा वापर करण्यात येणार आहे. ही पूर्ण प्रणाली ओटीपीच्या मदतीने काम करते. ओटीपीच्या मदतीनेच मोबाइल ॲपच्या माध्यमातून पैसे काढता येणार आहेत. 

सध्या येथे सुविधा
स्टेट बँक ॲाफ इंडिया, बँक ॲाफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, ॲक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक, इंडसईंड बँक यांच्या एटीएममध्ये सध्या कॅशलेस व्यवहार उपलब्ध आहेत.

यूपीआयद्वारे व्यवहार
एप्रिल २०२१ ते मार्च २०२२ = ४५अब्ज+
मागील आर्थिक वर्ष  = २२अब्ज+
चालू आर्थिक वर्षात व्यवहार= ८४ लाख कोटी

आघाडीवर कोण? । कंपनी व्यवहार %वारी
फोन पे २०.७अब्ज ४६%
गुगल पे १५.८अब्ज ३५%
व्हॉट्सॲप १७ दशलक्ष 
पेटीएम १३%

Web Title: Soon make cashless card withdrawals across all banks and ATM networks using UPI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.