Join us

Tour Package : 'IRCTC'सोबत करा दक्षिण भारताची सैर; 'या' ठिकाणी फिरण्याची शानदार संधी!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2022 2:14 PM

South India Divine Tour Package Ex Delhi :  आयआरसीटीसी तुम्हाला दक्षिण भारतातील प्रसिद्ध रामनाथस्वामी मंदिर, मीनाक्षी मंदिर, बालाजी मंदिर इत्यादींना भेट देण्याची संधी देत ​​आहे.

नवी दिल्ली : तुम्ही दक्षिण भारतात (South India) फिरण्याचा विचार करत असाल, तर इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) तुमच्यासाठी एक उत्तम हवाई टूर पॅकेज घेऊन आले आहे. त्यामुळे तुम्ही कुटुंबासोबत धार्मिक सहलीला जाण्याचा बेत आखू शकता. 

या पॅकेजमध्ये आयआरसीटीसी तुम्हाला दक्षिण भारतातील प्रसिद्ध रामनाथस्वामी मंदिर, मीनाक्षी मंदिर, बालाजी मंदिर इत्यादींना भेट देण्याची संधी देत ​​आहे. या टूरची सुरुवात दिल्लीतून होणार आहे.

आयआरसीटीसीने या पॅकेजची घोषणा आपल्या ट्विटर अकाउंटवरून केली आहे. ही संपूर्ण टूर 6 रात्री 7 दिवसांची असेल. हे पॅकेज दिल्लीतून सुरू होईल. या प्रवासादरम्यान तिरुपती, चेन्नई, त्रिवेंद्रम, कन्याकुमारी, रामेश्वरम आणि मदुराईला भेट दिली जाईल.

टूर पॅकेजसाठी खर्चया पॅकेजसाठी ट्रिपल ऑक्युपेंसीवर प्रति व्यक्ती खर्च 45,260 रुपये आहे. डबल ऑक्युपेंसीवर प्रति व्यक्ती 47,190 रुपये खर्च येईल. तर सिंगल ऑक्युपेंसीचा प्रति व्यक्ती खर्च 59,760 रुपये आहे. 5 ते 11 वर्षे वयोगटातील मुलासाठी बेडसह 40,120 रुपये आणि बेडशिवाय 35,610 रुपये शुल्क आकारले जाते. याशिवाय,  2 ते 4 वर्षांच्या मुलासाठी बेडशिवाय 28,820 रुपये मोजावे लागतील.

या टूर पॅकेजची खासियत...पॅकेजचे नाव - South India Divine Tour Package Ex Delhiडेस्टिनेशन कव्हर - तिरूपती, चेन्नई, त्रिवेंद्रम, कन्याकुमारी, रामेश्वरम आणि मदुराई.किती दिवसांची असेल टूर - 6 रात्री आणि 7 दिवसटूरची सुरुवातीची तारीख - 19 ऑगस्ट, 2022 आणि 16 सप्टेंबर, 2022मील प्लॅन - ब्रेकफास्ट आणि डिनरक्लास - कंफर्ट

असे करू शकता बुक...तुम्ही हे टूर पॅकेज घेण्यासाठी आयआरसीटीसीच्या वेबसाइटला (www.irctctourism.com) भेट देऊन ऑनलाइन बुकिंग करू शकता. याशिवाय, आयआरसीटीसी पर्यटन सुविधा केंद्र, झोनल ऑफिस आणि रिजनल ऑफिसमधूनही बुकिंग करता येईल.

टॅग्स :पर्यटनजरा हटकेआयआरसीटीसी