Lokmat Money > बिझनेस न्यूज > Sovereign Gold Bond Scheme: सोन्याची किंमत विक्रमी पातळीवर, तरीही सॉवरेन गोल्ड बॉन्डची मागणी वाढली; कारण काय?

Sovereign Gold Bond Scheme: सोन्याची किंमत विक्रमी पातळीवर, तरीही सॉवरेन गोल्ड बॉन्डची मागणी वाढली; कारण काय?

Sovereign Gold Bond Scheme : सोन्याच्या झपाट्यानं वाढणाऱ्या किमतींमध्ये एसजीबीमधील गुंतवणुकीचं आकर्षण इतकं वाढलंय की, २०१५ पासून जारी करण्यात आलेल्या एसजीबी युनिट्समधील ३० टक्के गुंतवणूक केवळ आर्थिक वर्ष २०२४ मध्ये करण्यात आली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2024 09:12 AM2024-05-28T09:12:09+5:302024-05-28T09:13:14+5:30

Sovereign Gold Bond Scheme : सोन्याच्या झपाट्यानं वाढणाऱ्या किमतींमध्ये एसजीबीमधील गुंतवणुकीचं आकर्षण इतकं वाढलंय की, २०१५ पासून जारी करण्यात आलेल्या एसजीबी युनिट्समधील ३० टक्के गुंतवणूक केवळ आर्थिक वर्ष २०२४ मध्ये करण्यात आली आहे.

Sovereign Gold Bond Scheme Gold prices at record highs yet demand for sovereign gold bonds rises find out reason | Sovereign Gold Bond Scheme: सोन्याची किंमत विक्रमी पातळीवर, तरीही सॉवरेन गोल्ड बॉन्डची मागणी वाढली; कारण काय?

Sovereign Gold Bond Scheme: सोन्याची किंमत विक्रमी पातळीवर, तरीही सॉवरेन गोल्ड बॉन्डची मागणी वाढली; कारण काय?

Sovereign Gold Bond Scheme : गोल्ड असेट क्लासमधील गुंतवणूकदारांची पसंती सॉवरेन गोल्ड बॉन्डकडे (Sovereign Gold Bond) तेजीनं वाढत आहे. सोन्याच्या झपाट्यानं वाढणाऱ्या किमतींमध्ये एसजीबीमधील गुंतवणुकीचं आकर्षण इतकं वाढलंय की, २०१५ पासून जारी करण्यात आलेल्या एसजीबी युनिट्समधील ३० टक्के गुंतवणूक केवळ आर्थिक वर्ष २०२४ मध्ये करण्यात आली आहे.
 

सॉवरेन गोल्ड बॉन्डमध्ये गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदारही दरवाढीकडे दुर्लक्ष करत आहेत. पुढे जाऊन सोन्याचे दर आणखी वाढतील, असं त्यांना वाटत आहे. हेच कारण आहे की सेकंडरी मार्केटमध्ये एसजीबी युनिट्स प्रीमियमवर ट्रेड होत आहेत. आरएनएसईच्या आकडेवारीनुसार, सध्या एकूण ६४ गोल्ड बॉन्ड ट्रेडिंगसाठी उपलब्ध आहेत. यापैकी ६२ प्रीमियमवर व्यवहार करत आहेत. आयबीजेएनुसार, सोमवारी २४ कॅरेट सोन्याचा (९९९) भाव ७१,१६२ रुपये प्रति १० ग्रॅम होता.
 

सोन्याचे दर वाढण्याची शक्यता
 

आनंद राठी शेअर्स अँड स्टॉक ब्रोकर्सचे कमॉडिटी-करन्सी प्रमुख नवीन माथूर यांच्या मते, सोन्याचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. मध्यवर्ती बँका, ईटीएफ आणि वैयक्तिक विक्रीतून सोन्याची मागणी वाढल्याचं आपण पाहिलं आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना प्रत्यक्ष सोनं खरेदी करण्याच्या त्रासात पडायचं नाही. त्यामुळे ते एसजीबीसाठी जात आहेत. अशा परिस्थितीत सेकंडरी मार्केटमध्ये उपलब्ध असलेल्या गोल्ड बॉन्डमध्ये गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदार उत्सुक असतात.
 

विकण्यात स्वारस्य नाही
 

सोन्याच्या दरात तेजी असताना दुय्यम बाजारात एसजीबी विकण्याची उत्सुकता नाही. कमॉडिटी तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, ज्यांचं डिमॅट खातं आहे ते सेकंडरी मार्केटमध्ये सॉवरेन गोल्ड बॉन्ड खरेदी करू शकतात. परंतु बहुतांश गोल्ड बॉन्ड्स सध्या प्रीमियमवर म्हणजेच बाजारभावापेक्षा जास्त दराने ट्रेड करत आहेत. SGBDEC25 (२०१७-१८ दहावी सीरिज) मध्ये सर्वाधिक प्रीमियमवर दिसला. सेकंडरी मार्केटमध्ये ही सीरिज ६-७ टक्के प्रीमियमवर उपलब्ध आहे. याशिवायही अनेक सीरिज प्रीमिअमवर ट्रेड करत आहेत.
 

तज्ज्ञांच्या मते, सरकारनं २०२३ मध्ये १९ जून ते २३ जून दरम्यान २०२३-२४ या आर्थिक वर्षाची पहिली सीरिज खरेदी करण्याची संधी दिली होती. २१ फेब्रुवारीला सबस्क्राइब झालेली चौथी आणि शेवटची सीरिज (६७ वी गोल्ड बॉन्ड) जून २०२४ पूर्वी उपलब्ध होण्याची शक्यता नाही. २०१५ पासून एकूण सब्सक्रिप्शन १४६,९६१.५२९ किलोपर्यंत पोहोचले आहे. यापैकी एकट्या आर्थिक वर्ष २४ मध्ये ३३,३३५.७७८ किलो योगदान होतं. हे आर्थिक वर्ष २३ च्या तुलनेत ३.६२ पट अधिक आहे.

Web Title: Sovereign Gold Bond Scheme Gold prices at record highs yet demand for sovereign gold bonds rises find out reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.